✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 २५ डिसेंबर २०२५
गडचिरोली:- पोर्ला येथे आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुप्ता डांबर प्लांटच्या अगदी समोर, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मोठ्या हिवराच्या झाडाजवळ घडली.
आज दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारास घटना घडली. दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळल्याचे प्राथमिक स्वरूपावरून दिसून आले. धडक इतकी भीषण होती की गाडी कोणत्या दिशेने येत होती हेही स्पष्ट ओळखू येईना. दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती होती. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 55-60 वर्षे असल्याचे सांगण्यात येत.
दुचाकीचा क्रमांक MH 33 A J 3063 असल्याचे दिसून आले.
गाडी क्रमांकावरून चौकशी करताच ही दुचाकी नवीन लाडच, आमगाव (ता. वडसा, जि. गडचिरोली) येथील असल्याची माहिती मिळाली.
(मृत व्यक्तीची अधिकृत ओळख पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.)
घटनास्थळाजवळील नागरिकांनी अपघात पाहताच पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील, गावकरी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह गडचिरोली सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दुचाकी अनियंत्रित झाली की इतर कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

