वसा गावास रुग्णवाहिकेची भेट : डॉ. अभय बंग यांच्या हस्ते लोकार्पण

Rambhau
0

 ✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)

 🌐 26 डिसेंबर 2025

प्रतिनिधिक छायाचित्र: रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यासंदर्भातील लोकार्पणाचा प्रतीकात्मक फोटो. कार्यक्रमातील प्रत्यक्ष दृश्य नसून फक्त संदर्भासाठी वापरलेले चित्र.
प्रतिनिधिक छायाचित्र – रुग्णवाहिका लोकार्पणाचा प्रतीकात्मक फोटो

गडचिरोली तालुक्यातील वसा गावात आरोग्य सुविधांना चालना मिळावी यासाठी मुंबई येथील स्वामी समर्थ परिवाराने गुरुदेव सेवा मंडळाला नवीन रुग्णवाहिका प्रदान केली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. वसा गावात गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, या योगदानाचे डॉ. बंग यांनी कौतुक केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर होते. तसेच डॉ. राणी बंग, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी संघटन मंत्री रवी भुसारी, माजी उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, महिला रुग्णालय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. बंग म्हणाले,

"वसा गाव सेवाभावाने कार्य करणारे प्रेरणादायी गाव आहे. मिळालेली रुग्णवाहिका ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरेल. आरोग्य हीच खरी संपत्ती असून या सेवेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतील," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे व डॉ. राणी बंग यांनीही गावाच्या उपक्रमांचे कौतुक करत सदिच्छा व्यक्त केल्या.

मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी चालक सुनील शिवणकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी भुसारी यांनी, तर सूत्रसंचालन शंकर इंगळे व चंद्रहास भुसारी यांनी केले. आभार प्रदर्शन पोलिस पाटील मुरारी दहिकर यांनी मानले.

या उपक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दुधराम डोर्लीकर, सचिव संतोष भोयर यांच्यासह ग्रामस्थ व गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले.

निष्कर्ष

नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे वसा परिसरातील आरोग्य सेवेची उपलब्धता मजबूत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!