✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)
🌐 २४ डिसेंबर २०२५
पोरला:- आज सायंकाळी पाच वाजता ग्रामपंचायत पोरला येथे प. पू. श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ध्यान कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना कुंडलिनी जागृती, आत्मसाक्षात्कार व ध्यानयोगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हितेंद्र बारसागडे (पोलीस पाटील, पोरला), अजय चापले (ग्रामपंचायत सदस्य, पोरला), राजगोपाल गेडाम (तंटामुक्ती अध्यक्ष पोरला), रामकृष्ण बोरुले (शाळा समिती अध्यक्ष व तंटामुक्ती सदस्य पोरला), उमेश खरवडे पोरला, शालिकराम येचीललवार पोरला, नितीन जेगन्टे पोरला, रोशन येवले पोरला आदी मान्यवर उपस्थित होते.
सहजयोग म्हणजे काय, ध्यानयोगाचे महत्त्व व त्याचे मानवी जीवनावरील सकारात्मक परिणाम याबाबत जयदेवजी चिचघरे यांनी मार्गदर्शन केले. मानवी नाड्या व शरीरातील सप्तचक्र यांची सविस्तर माहिती अनिल कोहाडवार (माजी जिल्हा समन्वयक) यांनी दिली. तसेच सहजयोग ध्यान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक व सखोल मार्गदर्शन मा. वैशाली कोसरे मॅडम (जिल्हा नारीशक्ती प्रमुख, सहजयोग) यांनी उपस्थितांना दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शुभांगी कलसार यांनी केली, तर आभार प्रदर्शन अनिल कोहाडवार यांनी मानले.
या कार्यक्रमामुळे उपस्थित नागरिकांना मानसिक शांती, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी व आरोग्य संतुलनाचे महत्त्व पटल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

