गडचिरोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा | रस्ता सुरक्षा जनजागृती, विद्यार्थ्यांचा सन्मान

Rambhau
0

 ✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज)

 🌐 २४ डिसेंबर २०२५

गडचिरोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा सत्कार
गडचिरोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा सत्कार

गडचिरोली:- महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त (२४ डिसेंबर) गडचिरोली येथील गोंडवाना कला केंद्र, पोटेगांव रोड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अंतर्गत उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शिकेचे वाटप करून करण्यात आली. यावेळी तीन ते चार नागरिकांना सुरक्षा हेल्मेटचे वाटप देखील करण्यात आले.

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली तर्फे हेल्मेट वाटप

यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळकरी मुली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुस्वागतम गीताने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. अविश्यांत पंडा (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. नितीन कुमार स्वामी, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रणजित यादव (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी, मा. श्रीमती अस्मिता गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, मा. श्री. सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, मा. श्री. सादिक झवेरी, माजी अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण कायदा, डिजिटल युगातील ग्राहकांची जबाबदारी तसेच केंद्र शासनाने यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनासाठी निश्चित केलेल्या

“Efficient and Speedy Disposal Through Digital Justice” या संकल्पनेवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या मध्यंतरात रामनगर, गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

निबंध स्पर्धा निकाल :

▪️ प्रथम – तनया उंदीरवाडे

▪️ द्वितीय – कृतिका गुरनुले

▪️ तृतीय – पूर्वा देशमुख

रांगोळी स्पर्धा निकाल :

▪️ प्रथम – नाविका वाढई

▪️ द्वितीय – प्रांजल भोयर

▪️ तृतीय – जानवी शेट्टी

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गडचिरोली येथे विद्यार्थ्यांना निबंध व रांगोळी स्पर्धेचे सन्मानपत्र प्रदान

यानंतर ज्येष्ठ स्वस्त धान्य दुकानदारांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरीष कापडे (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी), मनोज डहारे (खरेदी अधिकारी), सागर कांबळे (तहसीलदार) यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे स्वागत श्री. रुपचंद फुलझेले, वैद्यमापन शास्व सहाय्यक नियंत्रक, गडचिरोली यांनी केले.

ग्राहक हक्कांविषयी जागृती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रस्ता सुरक्षा संदेश यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

गडचिरोली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात उपस्थित नागरिक व मान्यवर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!