मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पोर्ला-वसा येथे खुली व्यायामशाळा व क्रीडांगणाचे भूमिपूजन

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज संपादकीय टीम 

 📅 ३० जानेवारी २०२६

पोर्ला-वसा ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खुली व्यायामशाळा व क्रीडांगण भूमिपूजन कार्यक्रम
पोर्ला-वसा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खुली व्यायामशाळा व क्रीडांगणाच्या कामाचे भूमिपूजन करताना ग्रामस्थ व पदाधिकारी.



पोर्ला आणि वसा ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खुली व्यायामशाळा व क्रीडांगणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. पोर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निवृत्ताताई राऊत व वसा ग्रामपंचायतीचे सरपंच मुखरुजी झोडगे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.


दोन्ही गावांतील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच युवक-युवतींना खुल्या वातावरणात नियमित व्यायामाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेषतः पोलीस भरतीसाठी आवश्यक मैदानी कवायत, धावणे तसेच विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी क्रीडांगणाची गरज दीर्घकाळ जाणवत होती.

संबंधित बातमी वाचा: पोरला प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम – जानेवारी २०२६


या पार्श्वभूमीवर पोर्ला व वसा ग्रामपंचायतींनी समन्वय साधत देलोडा रोडलगत दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खुल्या जागेत लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून खुली व्यायामशाळा व क्रीडांगण उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे परिसरातील तरुणाईला सरावासाठी एक सुरक्षित व उपयुक्त जागा उपलब्ध होणार आहे.


 उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


या भूमिपूजन कार्यक्रमाला पोर्ला येथील उपसरपंच सुजीत राऊत, पोरला ग्रामसेवक निमगडे,  वसा ग्रामसेवक नैताम ग्रामपंचायत सदस्य अनिल चापले, अजय चापले, रेखाताई शेंदरे, लिनाताई उंदिरवाडे यांची उपस्थिती होती. वसा ग्रामपंचायतीकडून सदस्य प्रितेश अंबादे, शिवराम नैताम, मंगलाताई भोयर उपस्थित होते.


कार्यक्रमास वसा पोलीस पाटील मुरारी दहीकर, पोरला पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे, पोर्ला तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपाल गेडाम, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र सेलोटे, वनपाल रोकडे, वनरक्षक विकास शिवणकर, तसेच  यांच्यासह मधुकर बानबले, पुनित उपासे, चंद्रकांत निकुरे, परशुराम भोयर, ईश्वर तिवाडे, देविदास चापले व अनेक नागरिक उपस्थित होते.


या उपक्रमाचे दोन्ही गावांतील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोर्ला व वसा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.



वाचकांसाठी FAQ (प्रश्नोत्तर)
पोर्ला-वसा येथे नेमका कोणता उपक्रम सुरू झाला आहे?
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खुली व्यायामशाळा व क्रीडांगण उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम कोणाच्या पुढाकारातून राबवला जात आहे?
ग्रामपंचायत पोर्ला व ग्रामपंचायत वसा यांच्या संयुक्त नियोजनातून हा उपक्रम राबवला जात आहे.
व्यायामशाळा व क्रीडांगण कुठे उभारले जाणार आहे?
दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देलोडा रोडलगतच्या खुल्या जागेत ही सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
या सुविधांचा फायदा कोणाला होणार आहे?
या सुविधांचा फायदा पोर्ला व वसा येथील नागरिकांना होणार असून तरुणांसाठी मैदानी तयारी व क्रीडा उपक्रमांना चालना मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!