अजित पवारांच्या निधनानंतर दुखवटा; 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज संपादकीय टीम 

 📅 ३० जानेवारी २०२६


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान-मतमोजणी तारखांमध्ये बदल (प्रातिनिधिक AI इमेज)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. (प्रातिनिधिक फोटो)


मुंबई, दि. 29 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याने राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्यांतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मतदान व मतमोजणीच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. आता केवळ मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

संबंधित बातमी वाचा: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका – फेब्रुवारी २०२६, SEC अपडेट


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात अधिकृत दुखवटा जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांचे वेळापत्रक सुधारित करण्यात आले आहे.


निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम: मतदान 7 फेब्रुवारी, मतमोजणी 9 फेब्रुवारी


सुधारित कार्यक्रमानुसार, यापूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहील. तसेच, 7 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजित असलेली मतमोजणी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.


या बदलामुळे निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता करण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.


मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


खालील प्रश्नावर टच/क्लिक केल्यावर उत्तर दिसेल.

1) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आता कधी होणार?
सुधारित कार्यक्रमानुसार मतदान 7 फेब्रुवारी 2026 रोजी होईल.
2) मतदानाची वेळ काय असेल?
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहील.
3) मतमोजणीची तारीख बदलली आहे का? आता मतमोजणी कधी?
हो. मतमोजणी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
4) प्रचाराची अंतिम मुदत (जाहीर प्रचार समाप्ती) कधी आहे?
जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल.
5) आचारसंहिता कधी संपेल?
मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.
6) निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात कधी प्रसिद्ध होतील?
निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!