चंद्रपुरात वाघाचा धुमाकूळ! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांचा मृत्यू

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 २२ मे २०२६

शिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू
सिदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू


चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. गावागावात भीती पसरली असून लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही जंगल परिसर गावातील अनेक महिला रोजच्या प्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. काही महिला जंगलात काम करत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्या दिशेने धाव घेत हल्ला केला. वाघ दिसताच महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत पळायला सुरुवात केली.

📢 महत्वाची बातमी:
चांभार्डा येथे जखमी बिबटाचा मृत्यू; तिघा गावकऱ्यांवर हल्ला, वाघाशी झुंजीचा अंदाज

👉 संपूर्ण बातमी वाचा


मात्र या गोंधळात चार महिला वाघाच्या तावडीत सापडल्या. हल्ला इतका भयानक होता की चारही महिलांचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. बाकी महिलांनी कसाबसा जीव वाचवत जंगलातून बाहेर पडून गावात येत घटनेची माहिती दिली. ही बातमी समजताच गावात एकच घबराट पसरली.


आता तरी वाघाचा बंदोबस्त करा”; ग्रामस्थांचा इशारा


या घटनेत मृत झालेल्या महिलांमध्ये कडूबाई दादाजी मोहर्ले, अणुबाई दादाजी मोहर्ले, सुनीता कौशिक मोहर्ले आणि संगीता संतोष चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती आहे. घटना समजताच वनविभागाचे कर्मचारी जंगलात पोहोचले असून वाघाचा शोध सुरू करण्यात आला आहे.


दरम्यान, गावकऱ्यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. परिसरात याआधीही वाघाचे हल्ले होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “लोकांचे जीव जात आहेत आणि वनविभाग फक्त पाहत बसला आहे का?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

📢 महत्वाची अपडेट:
गडचिरोलीत 12 शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं; शेकरूसह दुर्मीळ प्राण्यांची शिकार उघड

👉 संपूर्ण बातमी वाचा


तसेच नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, नाहीतर मोठं आंदोलन उभं करू, असा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेमुळे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणाऱ्या मजूर कुटुंबांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. 

रिचार्जबेल टॉर्च
🔥 जंगलात जाणाऱ्यांसाठी उपयोगी Rechargeable Torch

रात्रीचा प्रवास, शेत, जंगल किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणारी दमदार LED टॉर्च

👉 इथे क्लिक करून पहा
.
ही घटना कुठे घडली?
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात ही घटना घडली.
महिला जंगलात कशासाठी गेल्या होत्या?
महिला रोजच्या प्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या.
या हल्ल्यात किती महिलांचा मृत्यू झाला?
वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांची मागणी काय आहे?
नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!