✍️लोकवाणी आवाज टिम
📅 २२ मे २०२६
![]() |
| जुन्या गाडीवर HSRP प्लेट बसवण्याची मुदत ३० जून २०२६ — वेळेत लावा, दंड वाचवा |
तुमच्या गाडीवर अजून जुनीच नंबर प्लेट आहे? मग हे नक्की वाचा - कारण आता खरोखरच शेवटची संधी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सगळ्या जुन्या गाड्यांना HSRP प्लेट लावण्याची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवली आहे.
आधी डिसेंबर २०२५ ची मुदत होती -पण राज्यात निम्म्याच गाड्यांवर HSRP लागली, बाकीच्यांनी ढकलतच राहिले. त्यामुळे सरकारने आणखी सहा महिने दिले. पण आता मात्र खरंच शेवटचं आहे - यापुढे मुदतवाढ नाही.
१ जुलैपासून रस्त्यावर थेट दंड!
३० जून संपला की लगेच दुसऱ्या दिवसापासून परिवहन विभागाची तपासणी पथके रस्त्यावर उतरणार आहेत. गाडीवर HSRP नसेल तर थेट १,००० रुपये दंड खिशातून जाणार. अपॉईंटमेंट घेतली पण प्लेट अजून लावली नाही - तरीही सूट नाही, वेळेत काम पूर्ण केलेलं बरं.
अपॉईंटमेंट घ्यायची कुठे? - transport.maharashtra.gov.in या सरकारी वेबसाईटवर जा आणि ३० जूनपूर्वी ऑनलाईन बुकिंग करा. परिवहन विभागाचे अधिकारी शैलेश कामत यांनी सांगितलं की जितक्या लवकर कराल तितकं चांगलं - शेवटच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली- पोर्ला मार्गावर एसटीत प्रवाशाशी वाद; उतरवण्याची धमकी, वाहकावर कारवाईची मागणी
👉 संपूर्ण बातमी वाचा
थोडक्यात - उद्यावर ढकलू नका, ३० जूनपूर्वी HSRP लावा आणि १,००० रुपयांचा दंड वाचवा!
🚗 Car Cleaning Kit — 8-in-1 Set
Vacuum + Duster + Brushes + Microfiber Cloth + Anti-fog Spray
🔥 गाडी स्वच्छ ठेवा — फक्त ₹590 मध्ये!
🛒 आत्ताच Flipkart वर खरेदी करा* Affiliate link | किंमत बदलू शकते


