गडचिरोली- पोर्ला मार्गावर एसटीत प्रवाशाशी वाद; उतरवण्याची धमकी, वाहकावर कारवाईची मागणी

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅२५ मार्च २०२५

पोर्ला मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवाशाशी वाद घालताना वाहक; बस थांबवून उतरवण्याची धमकी दिल्याचा आरोप
गडचिरोली- पोर्ला मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवाशांशी व वाहक, बस क्रमांक MH14 MH 3821


गडचिरोली : गडचिरोलीहून पोर्ला मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशाशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कन्नमवार वॉर्ड येथील जयवंत संतोष चापले यांनी याबाबत गडचिरोली आगाराकडे तक्रार देत संबंधित वाहकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


२५ मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास गडचिरोलीहून निघालेल्या पोर्ला जाणाऱ्या बसमध्ये चापले हे आपल्या मुलासोबत बसले होते. प्रवासादरम्यान तिकीटावरून बसमधील वाहकाशी त्यांचा वाद झाला.


पोर्ल्याचे तिकीट देण्यास नकार देत वाहकाने त्यांच्याशी अपशब्दात बोलल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर पाल नदीजवळ उतरवण्याची धमकी देत बस थांबवण्यात आल्याचंही निवेदनात आहे. चापले यांनी विनंती केल्यानंतरही पोर्ल्याचं तिकीट न देता आरमोरीचं तिकीट देऊन बस पुढे नेण्यात आल्याची माहिती आहे.


५० रुपयांवरून वाद, दमदाटी आणि गैरवर्तनाचा आरोप


तिकीटाच्या मागे नमूद असलेल्या ५० रुपयांवरूनही वाद चिघळल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित रक्कम देण्यास नकार देत “डेपोमध्ये येऊन घेऊन जा” असं सांगण्यात आलं. यावेळी दमदाटी करत "तुला जे काही करायचे कर" तू माझे काहीच करू शकणार नाही. असे अपमानास्पद शब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


तसेच संबंधित वाहकाकडून महिलांसोबतही अशाच प्रकारचं गैरवर्तन होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे अशा वागणाऱ्या वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास गडचिरोली आगारासमोर कुटुंबासह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आगार प्रशासनाची राहील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


गडचिरोली- पोर्ला मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशाशी तिकीटावरून वाद झाला असून, गैरवर्तन व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोर्ला तिकीट देण्यास नकार, बस थांबवून उतरवण्याची धमकी, अपशब्द वापरणे आणि ५० रुपये न देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास गडचिरोली आगारासमोर कुटुंबासह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!