✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २५ मार्च २०२६
![]() |
| डोंगरगाव, शिवनी, येवली परिसरातील नागरिक चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने जमलेले |
आज 25 मार्च 2026 ला सकाळी सुमारे नऊ वाजता डोंगरगावमध्ये परिसरातील गावकरी थेट रस्त्यावर उतरले. हेमंत भाऊ जम्बेवार सहसंपर्क प्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. डोंगरगाव, शिवनी, येवली आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनामागचं कारण स्पष्ट होतं. सुरजागड बाजूने येणाऱ्या मोठ्या गाड्या गावाजवळ आल्या तरी स्पीड कमी करत नाहीत. रस्त्यालगत शाळा असल्याने मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत.
महिलांना पाणी आणण्यासाठी रोज रस्ता ओलांडावा लागतो. अशावेळी भरधाव गाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. याआधीही काही विद्यार्थ्यांचे जीव गेले असल्याने लोकांनी अखेर रस्ता अडवून आपला आवाज उठवला.
गावाजवळ गाड्या हळू चालवा” – ग्रामस्थांचा इशारा
गावकऱ्यांनी स्पष्ट मागणी केली की, गावाजवळ आलं की गाड्या हळू चालल्या पाहिजेत. जिथे जिथे गावं रोडलगत आहेत तिथे सिक्युरिटी गार्ड ठेवावेत, स्पीड कंट्रोल करावा आणि रोडच्या मध्ये डिव्हायडर लावावा.
![]() |
| हेमंत भाऊ जम्बेवार यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांकडून चव्हाण साहेबांना निवेदन सादर |
तसंच लॉयड्स मेटल्स कंपनीमध्ये स्थानिकांना आधी नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आधी कच्चा माल इथेच प्रक्रिया करणार असं सांगितलं होतं, पण आता तो कच्चामाल बाहेर पाठवला जातोय. जर इथेच प्रक्रिया झाली असती तर रोजगार वाढला असता आणि इथल्या स्थानिकांना थेट फायदा झाला असता, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून परिस्थिती शांत केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपलं निवेदन पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांना देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं.
या आंदोलनात वसंतजी गावतुरे शिवसेना गडचिरोली तालुका अध्यक्ष, सौ. श्रीदेवी वरघंटीवार महिला जिल्हाप्रमुख शिवसेना, रेखाताई डोळस बीजेपी महिला महाराष्ट्र मोर्चा कमिटी, शितल बन्सोड महिला तालुका प्रमुख शिवसेना, नेपालजी माधमवार सरपंच डोंगरगाव, बाळकृष्ण पाटील बोरकुटे ओबीसी विजेंटि तालुकाप्रमुख शिवसेना, उमाजी पीपरे शिवसेना कार्यकर्ता, कोहळेजी गोविंदपुर, निखिल पुण्यप्रोटीवर येवली, श्रीकांत भांडेकर सामाजिक कार्यकर्ता येवली, नरेश मेश्राम शिवसेना कार्यकर्ता, प्रफुल लोणारे शिवसेना कार्यकर्ता शिवनी, श्री केटेले डोंगरगाव, मोहन कुंडघाडकर मारकबोडी, रुपेश चौधरी मारकबोडी, भुरसेजी मारकबोडी, चोखाजी भांडेकर सामाजिक कार्यकर्ता येवली, लोकेश जेगंटे मुडझा, कुणाल गावतुरे शिवनी, कोसलताई सरपंच डोंगरगाव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


