NHM भरतीत स्थानिकांना संधी द्या; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅 १२ मार्च २०२६


NHM भरतीत स्थानिक युवक-युवतींना संधी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी कार्यालयासमोर निवेदन दिले
NHM गडचिरोली कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करत निवेदन दिले


गडचिरोली जिल्ह्यात नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत GNM ची ५४ पदे तसेच इतर काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून त्यामध्ये इतर जिल्ह्यांतील उमेदवारांचाही समावेश असल्यामुळे स्थानिक युवक-युवतींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


माहितीनुसार या भरती प्रक्रियेसाठी जवळपास ३५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उमेदवारांचे अर्ज आले आहेत. सध्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून अंतिम यादीत स्थानिक मुला-मुलींना पुरेशी संधी मिळेल का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


या पार्श्वभूमीवर हेमंतभाऊ जम्बेवार सहसंपर्क प्रमुख शिवसेना, व शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माननीय आरोग्यमंत्री यांच्याकडेही व्हाट्सअपच्या माध्यमातून विनंती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.


संबंधित बातमी : NHM गडचिरोली भरती 2026 : जिल्ह्यात 172 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले


स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी


शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील मुला-मुलींना रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे NHM अंतर्गत होणाऱ्या भरतीत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.


जर अंतिम यादीत बाहेरील जिल्ह्यांतील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली गेली तर शिवसेनेच्या वतीने नॅशनल हेल्थ मिशन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेच्या वतीने श्रीदेवी अविनाश वरघंटीवार – महिला आघाडी जिल्हाप्रमुख, वसंत गावतुरे – तालुकाप्रमुख, तसेच शितल घनश्याम बनसोड – शहर प्रमुख उपस्थित होते.


हेही वाचा : गडचिरोली NHM 15th Finance Commission भरती अपडेट : आरोग्य विभागातील पदभरतीबाबत महत्त्वाची माहिती


तसेच चरणदास बाजीराव बोरकुटे, देवराव कवडूजी पाल, अज्ञान नारायण पाल, तात्याची नागाजी दिवटे, बाळकृष्ण बाजीराव बोरकुटे, महेश डंबाजी राऊत, उमाकांत लालाजी हर्ष, नेपाल राजाराम माधमवार, वैभव कामराज बांबोळे, अरविंद देवराव बावणे, वेदांत कृष्णा बावणे, प्रकाश नामदेव चौधरी, योगराज नक्टूजी रामटेके, प्रमोद बाबुराव सोदुरवार, मुकरू नामदेव बोभाटे, रोशन प्रकाश चौधरी, लोमेश आनंदराव जेगंटे, जगदीश राजू लोनबले, सत्यवत्ता प्रभाकर चौधरी, सुजाता मिथुन चन्ने, मयुरी सुखदेव दुग्गा, शांताबाई भिमराव बांबोळे, तनुजा योगराज रामटेके, सुषमा नितीन गेडाम, शितल संदीप मेश्राम, गुरुदेव मारुती बावणे, चोकाजी धर्माजी बांबोळे, राहुल नामदेव चापले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


गडचिरोली NHM भरतीवरून चिंता का निर्माण होत आहे
नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत सुरू असलेल्या भरतीसाठी बाहेरील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने स्थानिक युवक-युवतींना संधी मिळेल का याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
शिवसेनेची व स्थानिक नागरिकांची नेमकी मागणी काय आहे?
शिवसेना व नागरिकांच्या वतीने NHM भरती प्रक्रियेत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
स्थानिकांना संधी न मिळाल्यास काय इशारा देण्यात आला आहे?
जर अंतिम यादीत स्थानिक उमेदवारांना संधी दिली नाही तर NHM कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!