✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २३ मार्च २०२६
![]() |
| पोरला येथे STC SEVA MOB च्या आरोग्य शिबिरात गावकऱ्यांची तपासणी करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी |
पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी:- गडचिरोली जिल्ह्यातील पोरला गावात आज 23 मार्च 2026 रोजी जुनी ग्रामपंचायत येथील अंगणवाडी केंद्रात STC SEVA MOB या संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात गावातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. BP, शुगर, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांवर मोफत तपासणी करून औषधे देण्यात आली.
संबंधित बातमी वाचा: आपला दवाखाना योजनेबाबत जनआरोग्य समितीचा महत्त्वाचा निर्णय
गावात शिबीर भरल्यामुळे अनेकांनी त्या ठिकाणीच आपली तपासणी करून घेतली. काहींनी डॉक्टरांकडून सल्ला घेतला तर काहींनी औषधोपचारही करून घेतले.
पोरला येथे STC SEVA MOB च्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद
या शिबिरात डॉ. श्रृंखला डोंगरे (MBBS) यांनी वैद्यकीय सेवा दिली. त्यांना निर्मला भोयर आणि मैथिली भोपये (सिस्टर) यांनी सहकार्य केले. तसेच अनिकेत रामटेके यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली.
हेही वाचा: गडचिरोलीत NHM भरतीवर स्थानिकांचा आक्रोश; शिवसेनेचा इशारा
तपासणीदरम्यान रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी सल्लाही देण्यात आला. त्यामुळे शिबिरात आलेल्या लोकांना थेट फायदा झाला.
यापुढेही अशा प्रकारचे शिबीर गावात घ्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

