भेदरी नाल्यात परवाना न घेता वाळू उपसा; सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पाहणी करून उघड केला प्रकार

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 २३ मार्च २०२६


येरमागड आश्रम शाळेची जुनी इमारत पाडून नवीन बांधकाम सुरू असल्याचे दृश्य
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येरमागड फलक आणि सुरू असलेले नवीन इमारत बांधकाम


धानोरा तालुक्यातील भेदरी नाला येथे परवाना न घेता वाळू काढण्याचा प्रकार उघड झाला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या या हालचालीची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी केली.


पाहणीदरम्यान नाल्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट दिसून आले. ठिकठिकाणी खणलेले भाग आणि बांधकाम ठिकाणी साठवलेली वाळू पाहून हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले.


संबंधित बातमी वाचा: गडचिरोलीत खनिज वाहतूक रस्त्याला मंजुरी; 857.65 किमी मार्गासाठी 274 कोटींची तरतूद


ही वाळू येरमागड येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या नवीन इमारतीसाठी वापरली जात आहे. जुनी शाळा पाडून त्याच जागेवर नवीन बांधकाम सुरू आहे. मात्र या कामासाठी शासनाचा परवाना न घेता सरळ वाळू काढण्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे शाळेचाच संबंधित कर्मचारी स्वतः पुढाकार घेऊन ठेकेदाराला वाळू पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित कर्मचारी आयशर MH 33 V 2933 या वाहनाने अवैधपणे वाळू पुरवठा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


चौकशी करा आणि कारवाई करा; सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा


या प्रकरणी शिवसेना ओबीसी विजेंटि जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ता निलकंठजी संदोरकर, सामाजिक कार्यकर्ता विलासजी बनारकर तसेच शिवसेना ओबीसी विजेंटि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा वैद्यकीय मदत कक्ष तालुका अध्यक्ष रामकृष्ण बोरुले यांनी प्रशासनाकडे योग्य कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे.

भेदरी नाला येथील मोठ्या प्रमाणात साठवलेली वाळू आणि आश्रम शाळा परिसरातील दृश्य
भेदरी नाला येथून काढलेली वाळू आश्रम शाळा बांधकामासाठी साठवलेली असल्याचे दृश्य



इतक्या उघडपणे वाळू उपसा सुरू असताना संबंधित विभाग काय करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल थेट बुडत आहे.


हेही वाचा: गडचिरोली कृषी महाविद्यालय भरती 2026; असिस्टंट प्रोफेसर व लायब्रेरियन पदांसाठी संधी


तसेच नाल्यातील मोठ्या प्रमाणात वाळू काढल्यामुळे पर्यावरणवरही थेट परिणाम होत आहे. त्यामुळे तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी, अन्यथा पुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

भेदरी नाल्यात नेमका काय प्रकार सुरू आहे?
भेदरी नाल्यात परवाना न घेता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून ही वाळू थेट बांधकामासाठी वापरली जात आहे.
ही वाळू कुठे वापरली जात आहे?
ही वाळू येरमागड येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी वापरली जात आहे.
या प्रकरणात कोणावर आरोप करण्यात आले आहेत?
संबंधित शाळेचा कर्मचारी स्वतःच्या वाहनाने ठेकेदाराला अवैधपणे वाळू पुरवठा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रशासनाकडे काय मागणी करण्यात आली आहे?
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!