✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २४ मार्च २०२६
![]() |
| पोरला अंगणवाडी केंद्रात आरोग्य दिनादरम्यान माता व बालकांची तपासणी आणि लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी |
पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी:- पोरला, दि. २४ मार्च २०२६ — अंगणवाडी केंद्र पोरला क्रमांक ५२० येथे आज ग्राम आरोग्य व स्वच्छता पोषण आहार आरोग्याशी संबंधित कार्यक्रम घेण्यात आला. या दिवशी लसीकरण सत्र आणि माता-बाल तपासणी घेण्यात आली.
या वेळी गरोदर माता, स्तनदा माता तसेच शून्य ते दहा वर्ष वयोगटातील बालकांना लसी देण्यात आल्या. लसीकरणाबद्दल थोडक्यात माहिती ही सांगण्यात आली.
गरोदर मातांची तपासणी करून त्यांची तब्येत पाहण्यात आली.
लसीकरण आणि तपासणी एकाच ठिकाणी
या उपक्रमात पोषण आणि स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी श्रीमती उईके सिस्टर, एएनएम कुमारी विद्या मेश्राम, सी एलेश्वी, अंगणवाडी सेविका भोयर ताई, ढवळे ताई तसेच आशा वर्कर सविता साखरे यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुले उपस्थित होते.

