✍️लोकवाणी आवाज टिम
📅 २१ मे २०२६
![]() |
| गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीसमोर तरुण उमेदवार येताना-जाताना; ७०% स्थानिक भरतीचा शासन निर्णय |
गडचिरोली: जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणाऱ्या कुठल्याही भरतीमध्ये ७० टक्के जागा त्याच जिल्ह्यातल्या स्थानिक मुलांसाठी राखीव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला असून राज्याच्या सहकार विभागाने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिक तरुणांना बाजूला सारून बाहेरचे उमेदवार आणले जात होते. वशिलेबाजी आणि बाहेरच्यांना झुकतं माप — हे चित्र आता बदलणार आहे.
शेतकऱ्यांना आता मोबाईलवरून खत बुकिंग? पुण्यात सुरू झाली चाचणी; जबरदस्तीची विक्री थांबण्याची शक्यता
👉 संपूर्ण बातमी वाचा
नव्या नियमानुसार स्थानिक उमेदवाराकडे त्या जिल्ह्याचं डोमिसाइल प्रमाणपत्र असणं बंधनकारक राहणार आहे. उर्वरित ३० टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी मिळेल. एक महत्त्वाची बाब म्हणजे — जर या ३० टक्के कोट्यात बाहेरचे उमेदवार उपलब्धच झाले नाहीत, तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधूनच भरल्या जाणार आहेत.
आधीच जाहिरात दिलेल्या भरतींनाही नवा नियम लागू
राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत आणि या सगळ्यांना हे नवं धोरण लागू होणार आहे. ज्या बँकांनी या निर्णयाआधी भरतीची जाहिरात दिली आहे मात्र प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, त्यांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्या तरुणांनी अर्ज केले आहेत त्यांनी आत्ताच या नव्या नियमाची माहिती करून घ्यायला हवी.
गडचिरोलीत बनावट नोटांचे रॅकेट उघड; अभियंता भावंडांसह चौघांना अटक
👉 पूर्ण माहिती वाचा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी सांगितलं की, या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल. स्थानिक कर्मचाऱ्यांना जिल्ह्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे ठाऊक असल्याने बँकेची सेवा अधिक दर्जेदार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
New Pattern IBPS Bank Clerk
15 Practice Sets for Main Exam — Disha Publication
⚡ मर्यादित वेळासाठी ऑफर!
🛒 आत्ताच Flipkart वर खरेदी करा* Affiliate link | किंमत बदलू शकते


