✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २० मे २०२६
![]() |
| मोबाईलवरून खत बुकिंगची चर्चा; शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा |
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खत खरेदीत मोठा बदल होण्याची शक्यता दिसत आहे. आता शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच खत बुक करता येणार असल्याची माहिती समोर येत असून पुणे जिल्ह्यात याची चाचणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खतासाठी होणारी धावपळ आणि दुकानात होणारा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या Agristack आणि Farmer ID प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन, पीक आणि आधार माहिती जोडण्याचं काम सुरू आहे. पुढे याच माहितीच्या आधारावर खत वितरणाची व्यवस्था ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल! ६ जूनच्या आसपास कोकणात एन्ट्रीची शक्यता; vidarbhat मात्र उष्णतेचा तडाखा कायम
👉 पूर्ण माहिती वाचा
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर भागात या संदर्भात चाचणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या नव्या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या खत दुकानांची माहिती मोबाईलवर दिसू शकते. त्यातून शेतकरी आवश्यक ते खत आधीच बुक करू शकतील आणि ठरलेल्या वेळेत दुकानातून घेऊ शकतील.
शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार?
सध्या अनेक ठिकाणी खत घेताना शेतकऱ्यांना नको असलेली औषधं किंवा इतर वस्तू घ्यायला लावल्या जातात, अशी तक्रार वारंवार ऐकायला मिळते. काही ठिकाणी खताचा साठा असूनही “खत संपलं” असं सांगितलं जात असल्याच्याही तक्रारी होतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही ऑनलाईन पद्धत उपयोगी ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
गडचिरोली कृषी महाविद्यालयात 11 पदांची भरती; सहाय्यक प्राध्यापक व सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी ऑफलाईन अर्ज
👉 संपूर्ण माहिती वाचा
या पद्धतीमध्ये शेतकरी Farmer ID च्या माध्यमातून जवळच्या दुकानातून खत बुक करू शकतील, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे वेळेवर खत मिळण्यास मदत होऊ शकते.
मात्र, राज्यभर ही व्यवस्था सुरू झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप शासनाकडून करण्यात आलेली नाही. सध्या काही ठिकाणी चाचणी आणि तयारी सुरू असल्याचंच सांगितलं जात आहे. शासनाकडून पुढील काळात याबाबत अधिक माहिती येण्याची शक्यता आहे.
Battery Spray Pump Machine
✅ 18L Capacity
✅ 12V Battery Support
✅ Strong Body Design
✅ शेती फवारणीसाठी उपयुक्त
✅ वापरण्यास सोपी मशीन


