गडचिरोलीत बनावट नोटांचे रॅकेट उघड; अभियंता भावंडांसह चौघांना अटक

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 १८ मे २०२६

गडचिरोली बनावट नोटा प्रकरणात नागपुरात पोलिसांची कारवाई करताना आरोपी आणि जप्त साहित्य
बनावट नोटा प्रकरण दर्शविणारे प्रतीकात्मक  चित्र



गडचिरोली शहरात एटीएममध्ये बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मोठे रॅकेट समोर आले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे थेट नागपूरपर्यंत पोहोचली असून, दोन अभियंता भावंडांनी भाड्याच्या फ्लॅटमध्ये बनावट नोटांची छपाई सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरात कारवाई करत चौघांना अटक केली आहे.


११ मे रोजी कारगिल चौक परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये शंभर रुपयांच्या काही नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, एटीएम मशीनने त्या नोटा स्वीकारल्या नाहीत. बँकेकडून पडताळणी केल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बँकेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी तपास सुरू केला.

📢 महत्वाची अपडेट:
गडचिरोलीत सकाळी धक्कादायक घटना; 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडला

👉 पूर्ण माहिती वाचा


तपासादरम्यान प्रमोद कोवे या युवकाच्या खात्यात या नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही रक्कम गडचिरोलीतील एका पानटपरी चालकाकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाची दिशा थेट नागपूरकडे वळाली.


नागपुरातील फ्लॅटमध्ये सुरू होती बनावट नोटांची छपाई


१६ मेच्या मध्यरात्री पोलिसांनी नागपुरातील एका भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत मयूर डोईजड आणि आदित्य डोईजड या सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. दोघेही उच्चशिक्षित असून एक सिव्हिल इंजिनिअर तर दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.


छाप्यामध्ये पोलिसांनी ५०, १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटांसह अत्याधुनिक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर आणि इतर साहित्य जप्त केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फ्लॅटमध्येच बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणल्या जात होत्या.

📢 महत्वाची बातमी:
गडचिरोलीत पीडितेची ओळख उघड; पत्रकारावर गुन्हा, पोलिसांची कारवाई

👉 संपूर्ण बातमी वाचा


विशेष म्हणजे, हे रॅकेट गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तांत्रिक ज्ञानाचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात असल्याने तपास यंत्रणाही सतर्क झाली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



सीसीटीव्ही कॅमेरा
📷 घर आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी स्मार्ट CCTV कॅमेरा
5MP WiFi PTZ CCTV Camera वर जबरदस्त ऑफर
Full HD क्लेरिटी | Night Vision | Mobile Control
🔥 74% OFF
फक्त ₹1,555 मध्ये
Limited Time Offer • Cash On Delivery उपलब्ध
.
गडचिरोलीत बनावट नोटांचे प्रकरण कसे उघड झाले?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी कोणते साहित्य जप्त केले?
पोलिसांनी बनावट नोटांसह कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
बनावट नोटांची छपाई कुठे सुरू होती?
नागपुरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये बनावट नोटांची छपाई सुरू असल्याचे तपासात समोर आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!