गडचिरोलीत 12 शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं; शेकरूसह दुर्मीळ प्राण्यांची शिकार उघड

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅२० एप्रिल २०२६

गडचिरोली जंगलाचे प्रतिनिधिक चित्र; झाडांवर दिसणारे शेकरू आणि उडणारी खार (प्रतिनिधी फोटो)
प्रातिनिधिक फोटो: गडचिरोलीच्या जंगलात आढळणारे शेकरू आणि उडणारी खार



गडचिरोली : आलापल्ली परिसरात वन विभागाने रविवारी सायंकाळी जोरदार कारवाई करत जंगलात लपून बसलेल्या शिकाऱ्यांच्या टोळीला पकडलं. या कारवाईत तब्बल १२ जणांना रंगेहाथ ताब्यात घेतलं गेलं असून दुर्मीळ प्राण्यांच्या शिकारीचा मोठा प्रकार समोर आला आहे.


वन विभागाचं पथक गस्त घालत असताना जंगलात काही हालचाल असल्याचा अंदाज आला. त्यानंतर पथकाने शांतपणे सापळा रचला. काही वेळातच शिकारींची टोळी दिसताच पाठलाग सुरू झाला आणि थरारक पद्धतीने सगळ्यांना पकडण्यात आलं.

⚠️ मोठी बातमी:
चांभार्डा येथे जखमी बिबटाचा मृत्यू; तिघा गावकऱ्यांवर हल्ला, वाघाशी झुंजीचा अंदाज

👉 संपूर्ण बातमी वाचा


या कारवाईत शिकाऱ्यांकडून शिकार केलेले प्राणी आणि शिकारीसाठी वापरायचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जंगलात अशा प्रकारे सुरू असलेल्या शिकारीमुळे वन्यजीवांवर मोठा धोका निर्माण होत असल्याचं चित्र पुन्हा समोर आलं आहे.


शेकरूसह दुर्मीळ प्राण्यांची शिकार उघड


या प्रकरणात ४ शेकरू, १ उडणारी खार, १ हारावत, १ हरियाल आणि १ दयाळ पक्ष्यांची शिकार केल्याचं समोर आलं आहे. तसेच ५ दुचाकी आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.


या सगळ्या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपासही सुरू असून या प्रकरणात आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

📢 महत्वाची अपडेट:
महाराष्ट्रात अभयारण्याबाहेरील १८० वाघांसाठी ५.४० कोटींचा विशेष निधी; मानव-वाघ संघर्षावर लक्ष

👉 पूर्ण माहिती वाचा


ही कारवाई उपवनसंरक्षक दीपाली तलमले आणि उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहायक पुनमचंद बुद्धावार, वनरक्षक दत्ता सुरवसे, नीलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी तसेच चौकीदार श्याम जंजार्लावार, नानाजी मडावी आणि देवाजी सडमेक यांच यात सहभाग होता.

 किती शिकारी पकडले गेले?
वन विभागाने 12 शिकाऱ्यांना जंगलातून रंगेहाथ पकडलं.
कोणत्या प्राण्यांची शिकार करण्यात आली?
शेकरू, उडणारी खार आणि काही दुर्मीळ पक्ष्यांची शिकार झाल्याचं समोर आलं.
ही कारवाई कुठे झाली?
आलापल्ली परिसरातील जंगल भागात ही कारवाई करण्यात आली.
आरोपींवर काय कारवाई झाली?
आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!