✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २२ एप्रिल २०२६
![]() |
| गडचिरोली गांधी चौक येथे महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ शिवसेनेचे धरणे आंदोलन करताना महिला व पुरुष कार्यकर्त्य व पदाधिकारी |
गडचिरोली शहरातील गांधी चौक मंगळवारी (21 एप्रिल 2026) शिवसेनेच्या धरणे आंदोलनाने गाजला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत भाऊ जम्बेंवार, महिला संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे, अहेरी विधानसभा क्षेत्र महिला जिल्हाप्रमुख पौर्णिमा ताई ईस्टाम, माजी महिला जिल्हाप्रमुख छाया ताई कुंभारे, गडचिरोली विधानसभा क्षेत्र महिला जिल्हाप्रमुख श्रीदेवी वरघंटिवार, महिला शहर प्रमुख शितल ताई बनसोड, तालुकाप्रमुख वसंत भाऊ गावतुरे, ओबीसी व्हिजेंटि तालुकाध्यक्ष बाळकृष्णजी बोरकुटे यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
NHM भरतीत स्थानिकांना संधी द्या; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा
👉 पूर्ण माहिती वाचा
यावेळी पदाधिकाऱ्यांनी महिलांना राजकारणात संधी देणाऱ्या आरक्षणाला विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगितले. महिलांचा आवाज निर्णय प्रक्रियेत पोहोचावा आणि त्यांना नेतृत्वाची संधी मिळावी, यासाठी हे आरक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा काय?
महिला आरक्षण म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद. या आरक्षणामुळे महिलांना निवडणूक लढवण्याची संधी वाढते, त्यांचा राजकारणातील सहभाग वाढतो आणि निर्णय घेणाऱ्या ठिकाणी महिलांचा आवाज अधिक मजबूत होण्यास मदत होते.
गडचिरोलीत शिवसेनेची आढावा बैठक; मतदार यादी पारदर्शकतेसोबत पदाधिकाऱ्यांची निवड
👉 संपूर्ण बातमी वाचा
गडचिरोलीतील या आंदोलनातून महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर पक्षांविरोधात शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे मांडली.

