✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ९ एप्रिल २०२६
![]() |
| गडचिरोलीत सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेना आढावा बैठकीतील दृश्य |
गडचिरोली : आज दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी गुरुवारी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्ह्यात संघटन बळकट करताना मतदार यादीत कुणाचेही नाव राहू नये, यासाठी यावेळी थेट आणि स्पष्ट चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
या बैठकीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा. हेमंत भाऊ जम्बेंवार साहेब आणि जिल्हाप्रमुख मा. राकेश भाऊ बेलसरे यांनी कार्यकर्त्यांना साध्या, बोलक्या भाषेत मार्गदर्शन केले. मतदार जनगणना करताना पारदर्शकता ठेवणे, प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि कोणताही मतदार वंचित राहू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी बीएलए (बूथ लेव्हल एजंट) आणि बूथ प्रमुखांची निवड करून गावागावात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गडचिरोली शहरप्रमुख पदावर नितेश उर्फ बंटीभाऊ खडगे यांची निवड करण्यात आली.
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या आढावा बैठकीस मा. पुंडलीकजी येवले साहेब, जिल्हाप्रमुख ओबीसी व्हीजेएनटी शिवसेना गडचिरोली, मा. बारसागडे भाऊ, युवासेना जिल्हाप्रमुख शिवसेना गडचिरोली, मा. सौ. श्रीदेवी वरघंटिवार गडचिरोली विधानसभा क्षेत्र महिला जिल्हाध्यक्ष शिवसेना,सौ. पौर्णिमा ईस्टाम शिवसेना अहेरी विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष, मा. सुनिता ताई कोकेरवार महिला जिल्हाप्रमुख शिवसेना (ओबीसी व्हीजेएनटी) गडचिरोली, मा. सौ. ज्योतीताई सोनकुसरे महिला उपजिल्हाप्रमुख (ओबीसी व्हीजेएनटी) गडचिरोली मा. शितल बनसोड महिला शहर प्रमुख गडचिरोली उपस्थित होत्या.
तसेच मा. राजूभाऊ कावळे माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना गडचिरोली, मा. वसंत भाऊ गावतुरे शिवसेना तालुकाप्रमुख गडचिरोली, मा. ईश्वरजी तिवाडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख (ओबीसी व्हीजेएनटी), मा. राकेशभाऊ मुरकुटे शिवसेना तालुकाप्रमुख चामोर्शी, मा. बाळकृष्ण बोरकुटे शिवसेना (ओबीसी व्हीजेएनटी), मा. पप्पू भाऊ पठाण शिवसेना तालुकाप्रमुख मुलचेरा, मा. येरमे शिवसेना तालुकाप्रमुख धानोरा, तसेच मा. रामकृष्णजी बोरुले शिवसेना प्रसिद्धी प्रमुख (ओबीसी व्हीजेएनटी) गडचिरोली यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सर्वांनी पुढील कामासाठी सकारात्मक प्रतिसाद देत जबाबदाऱ्या स्वीकारल्या. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि जय महाराष्ट्र, जय शिवसेना अशा घोषणांनी बैठकीचा समारोप करण्यात आला.

