✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २७ मार्च २०२६
![]() |
| त्रिमूर्ती चौकात राम नवमी निमित्त महाप्रसाद वाटप करताना पदाधिकारी व उपस्थित नागरिक |
गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी गडचिरोली शहरातील त्रिमूर्ती चौकात राम नवमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक व्यापारी वर्ग यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.
सकाळपासूनच श्रीरामाचे पूजन व भजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान चौकात लोकांची वर्दळ दिसून आली.
त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आले. उपस्थितांनी प्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
संयुक्त प्रयत्नातून उभा राहिला उत्सव
या कार्यक्रमासाठी मा. पुंडलिकजी येवले साहेब (OBC VJNT जिल्हाप्रमुख, शिवसेना), मा. अजय आसमवार (विधानसभा प्रमुख, OBC VJNT), डॉ. उनाडकर साहेब,मा. लालानी साहेब, मा. मोहीम कुरेशी, मा. आकाश भांडेकर, मा. अंकित गवारे, मा. बबलू शर्मा, मा. मनोज पिल्लेवार, मा. मुकुल खोब्रागडे, मा. वैभव येवले, मा. खडसे साहेब, मा. पोरडीवार साहेब, मा. संजय पोचलवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी वर्ग यांनी पुढाकार घेतला.
![]() |
| भगवान श्रीरामाच्या प्रतिमेसमोर सजवलेला मंडप व कार्यक्रमातील आयोजक |
कार्यक्रमाच्या तयारीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडत सहकार्य केले. या एकत्रित प्रयत्नातून त्रिमूर्ती चौकात राम नवमीचा कार्यक्रम उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडला.


