गडचिरोली येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; जनसंपर्क कार्यालयात मान्यवरांची उपस्थिती

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

 📅 १९ फेब्रुवारी २०२६ 


शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांकडून गडचिरोली येथे जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना उपस्थित मान्यवर
गडचिरोली येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे जनसंपर्क कार्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


गडचिरोली येथे शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील बटूवार कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथील ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ता राजूभाऊ कावळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरण करून घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला आणि शिवजयंती जल्लोषात साजरी केली.

अधिक वाचा: गडचिरोलीत शिवसेना मार्गदर्शक मेळावा; मंत्री आबिटकर यांची भेट


कार्यक्रमात जिल्हा व तालुका पातळीवरील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शिवजयंती निमित्त आपली एकजूट दर्शवली.


उपस्थित मान्यवरांची नावे व पदे


सौ. वर्षाताई मोरे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख गडचिरोली

पुंडलिकजी येवले साहेब, ओबीसी व्हीजेएनटी गडचिरोली जिल्हाप्रमुख

अविभाऊ वरघंटीवार, उपजिल्हाप्रमुख

राजूभाऊ कावळे, माजी जिल्हाप्रमुख

श्रीदेवी वरघंटीवार, महिला जिल्हाप्रमुख गडचिरोली विधानसभा

पौर्णिमाताई ईष्टाम, अहेरी विधानसभा क्षेत्र महिला जिल्हाप्रमुख

रत्नमाला येवले, तालुका प्रमुख शिवसेना


गडचिरोलीतील बटूवार कॉम्प्लेक्स येथील जनसंपर्क कार्यालयात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती साजरी केली.
गडचिरोली येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिवजयंती निमित्त जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या


शितल बनसोड, शहर प्रमुख

बंटीभाऊ खडसे, युवासेना प्रमुख 

रमेशभाऊ उपलवार, वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख

प्रशांत बंडावार, शिवसेना कार्यकर्ता

शुभांगी कंटकुलवार, महिला कार्यकर्ता शिवसेना

वैशाली आलम, महिला कार्यकर्ता शिवसेना

भावना कोंडूकवार, महिला कार्यकर्ता शिवसेना

रेखा सिडाम, महिला कार्यकर्ता शिवसेना


शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयात एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन केले आणि शिवभक्तीच्या वातावरणात शिवजयंती साजरी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!