✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १५ फेब्रुवारी २०२६
![]() |
| गडचिरोलीत शिवसेना स्वागत आणि वैद्यकीय कक्ष मार्गदर्शन कार्यक्रमातील कार्यक्रमाचे प्रमुख क्षण |
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली येथे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आयोजित मार्गदर्शक मेळावा, स्वागत कार्यक्रम आणि वैद्यकीय कक्ष नियुक्ती उपक्रम उत्साहात पार पडले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आंबिटकर साहेब आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.मंगेशजी चिवटे साहेब हे जिल्हा दौऱ्यावर आले असता सकाळी सर्वप्रथम जिल्हा रुग्णालय तसेच माता-बाल महिला रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यानंतर जिल्हा परिषद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात बैठक व स्वागत कार्यक्रम पार पडला. सभागृह खचाखच भरले होते आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या वेळी मा. आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब, मा. आमदार रामदासजी मसराम साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा लहाडे, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा. हेमंत भाऊ जम्बेंवार, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. राकेश भाऊ बेलसरे गडचिरोली,अहेरी विधानसभा क्षेत्र, माजी जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना संघटक मा. सुरेंद्र भाऊ चंदेल, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदिप भाऊ ठाकूर आरमोरी विधानसभा क्षेत्र, ओबीसी/व्हीजेएनटी जिल्हाप्रमुख मा. पुंडलिकजी येवले, तालुकाप्रमुख मा. वसंतजी गावतुरे आणि जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी/व्हीजेएनटी मा. ईश्वरजी तिवाडे उपस्थित होते.
👉 वाचाः मेटा स्टील प्रकल्पाविरोधात अडपली गावाने घेतलेली भूमिका — सविस्तर रिपोर्ट
तसेच मा. सौ. पौर्णिमा ईस्टाम महिला शिवसेना जिल्हा संघटिका, मा. सुनिता कोकेरवार महिला शिवसेना जिल्हा प्रमुख ओबीसी/व्हीजेएनटी, मा. ज्योतीताई सोनकुसरे महिला शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी/व्हीजेएनटी, मा. सौ. अंबादे ताई महिला शिवसेना संघटिका आरमोरी विधानसभा, मा. श्रीमती छाया ताई कुंभारे माजी महिला जिल्हाध्यक्षा शिवसेना, मा. निलकंठजी संदोंकर शिवसेना जिल्हा सचिव ओबीसी/व्हीजेएनटी, मा. रामकृष्णजी बोरूले शिवसेना जिल्हा मीडिया प्रमुख ओबीसी/व्हीजेएनटी तथा वैद्यकीय कक्ष तालुकाध्यक्ष गड., मा. बाळकृष्णजी बोरकुटे शिवसेना तालुका अध्यक्ष ओबीसी/व्हीजेएनटी गडचिरोली, मा. राकेशजी मुरकुटे शिवसेना तालुकाध्यक्ष चामोर्शी, मा. बारसागडे भाऊ युवासेना प्रमुख गडचिरोली, मा. पप्पी भाऊ पठाण, मा. येरमे भाऊ धानोरा तालुकाप्रमुख, मा. गोंधळे ताई आरमोरी, अविनाश वरघंटिवार, मा. सौ. शितल ताई बनसोड, मा. सौ. श्रीदेवी ताई वरघंटिवार, मा. कावळे साहेब माजी शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच प्लॅटिनियम स्पोर्ट क्लब गडचिरोलीचे अजित नाथांनी, डॉ. अमित साळवे, ॲड. सचिन कुंभारे, गोविंद सारडा, हेमंत राठी, मिलिंद घरोटे, समित नाथांनी, सागर निंबोरकर, गोल्डी अभिजीत कोरडे, श्रीकांत भुगुवार, निलेश पटले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी स्पष्ट सांगितले की दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा निर्धार सरकारचा आहे. आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित नसून प्रतिबंधात्मक तपासणी, औषध उपलब्धता, आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा समन्वय आवश्यक आहे. आदिवासी भागात सिकलसेल आजाराचे प्रमाण लक्षात घेता तपासणी मोहीम मिशन मोडमध्ये राबवून एकही व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्किट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये मार्गदर्शनानंतर नियुक्तीपत्र वितरण
बैठक आणि स्वागत कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे दाखल झाले. येथे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला. या सत्रात आरोग्य मंत्री मा. प्रकाश आंबिटकर साहेब, मा. मंगेशजी चिवटे साहेब शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य, मा. प्रवीण बालमुकुंद शर्मा शिवसेना वैद्यकीय कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख, डॉ. रहमान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर, कनेरसर आरोग्य दूत नागपूर, सुनील पिल्ले नागपूर जिल्हा प्रमुख वैद्यकीय कक्ष, मा. सत्यपालजी कुतरमारे संपर्क प्रमुख गडचिरोली वैद्यकीय कक्ष , मा. रमेशजी उपल्लवार गडचिरोली, आरमोरी वैद्यकीय कक्ष प्रमुख, मा. मनीकंठ गादेवार चामोर्शी-अहेरी जिल्हा प्रमुख वैद्यकीय कक्ष, डॉ. संगीता राऊत महिला आघाडी वैद्यकीय कक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
![]() |
| गडचिरोली येथे पार पडलेल्या शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व सत्कार करतानाचे दृश्य |
यानंतर शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना आरोग्य मंत्री मा. प्रकाश आंबिटकर साहेब आणि मंगेश चिवटे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. नियुक्तीपत्र स्वीकारताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य दिसून आले. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर आणि मान्यवरांनी पुढील नियोजित दौऱ्यासाठी चातगाव (शोधग्राम परिसर) कडे प्रयाण केले.


