✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ५ एप्रिल २०२६
![]() |
| नागपुरातील देशपांडे सभागृहात पार पडलेली शिवसेनेची आढावा बैठक |
नागपूर : रविवार (५ एप्रिल २०२६) रोजी सिव्हिल लाईन, आमदार निवासाजवळील देशपांडे सभागृहात शिवसेना पक्षाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला विदर्भ संपर्कप्रमुख मा. आमदार मनिषाताई कांयदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाच्या कामाचा आढावा घेतला आणि पुढील कामकाजाबाबत दिशा दिली.
तसेच वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. श्री. आशिषजी जयस्वाल यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून मोठी उपस्थिती
या बैठकीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, आजी-माजी आमदार, खासदार तसेच शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मा. संजय निरुपम,मा. कृपाल तुमाने यांसारखे नेतेही उपस्थित होते.
बैठकीतून पक्षाच्या पुढील कामकाजाबाबत स्पष्ट दिशा देण्यात आली. कार्यकर्त्यांना अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

