✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १९ एप्रिल २०२६
![]() |
| तरुणांसाठी विविध भरतीच्या संधी दर्शवणारी प्रतिनिधिक इमेज |
बँकेत नोकरी मिळवायची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी 350 जागांची भरती जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 एप्रिलपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर अशी पदे आहेत.
10वी पास तरुणांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये मोठी संधी; India Post GDS भरतीत 28,740 जागा
👉 पूर्ण माहिती वाचा
या भरतीत आयटी, फायनान्स, क्रेडिट, रिस्क मॅनेजमेंट, एचआर, मार्केटिंग, सिक्युरिटी, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये जागा आहेत. त्यामुळे विविध शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
Indian Bank SO Bharti 2026 साठी पात्रता
पदांनुसार शिक्षणाची अट वेगळी आहे. आयटीसाठी BE/B.Tech किंवा MCA लागते. फायनान्स आणि क्रेडिटसाठी CA, MBA किंवा CFA लागते. इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर पदांसाठी संबंधित शाखेची पदवी आवश्यक आहे.
उमेदवारांचे वय 22 ते 45 वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गांना नियमांनुसार सवलत दिली जाणार आहे.
नोकरी लागल्यावर चांगले वेतन मिळणार आहे. स्केल I साठी ₹48,480 ते ₹85,920, स्केल II साठी ₹64,820 ते ₹93,960 आणि स्केल III साठी ₹85,920 ते ₹1,05,280 इतके वेतन असेल. याशिवाय इतर भत्तेही मिळतील.
NHM व 15 वा वित्त आयोग अंतर्गत गडचिरोली पदभरती कागदपत्र पडताळणी स्थगित
👉 संपूर्ण बातमी वाचा
अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹1000 आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी ₹175 आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करावा.
( Disclaimer: )
या लेखातील माहिती सामान्य माहितीनुसार देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत वेबसाइट पाहावी.

