पोर्ला गावात मोफत रक्त तपासणी शिबिर; 134 नागरिकांनी केली तपासणी

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅२३ मे २०२६

पोर्ला गावातील मोफत रक्त तपासणी शिबिरात महिला व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती दिसून आली.
पोर्ला गावात आयोजित मोफत रक्त तपासणी शिबिरात तपासणीसाठी आलेले ग्रामस्थ



पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी:-  पोर्ला गावात लोककल्याण डायग्नोस्टिकच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जुनी ग्रामपंचायत, जुनी वस्ती येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये तब्बल 134 नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. सकाळपासूनच महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती.


या शिबिरामध्ये CBC, Sickle Cell, HPLC आणि Thalassemia या चार महत्त्वाच्या रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. ग्रामीण भागात अनेकांना वेळेत तपासणी करता येत नाही. त्यामुळे आजार लवकर लक्षात यावेत आणि पुढील उपचारासाठी मदत व्हावी, या हेतूने हे शिबिर घेण्यात आले होते.

📢 महत्वाची अपडेट:
गडचिरोलीत आरोग्यदूत योजना; पुजाऱ्यांमार्फत आदिवासींना डॉक्टरांकडे वळवण्याचा अनोखा प्रयोग

👉 पूर्ण माहिती वाचा


“रक्तदान नाही... रक्त तपासणी करा, आरोग्य जपा” असा संदेश देत ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक करण्यात आले. तपासणी झाल्यानंतर संबंधित रिपोर्टबाबत मार्गदर्शनही केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गावात अशा प्रकारचे मोफत शिबिर झाल्याने अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


लोककल्याण टीमने दिवसभर केले रक्तनमुने संकलन


या शिबिरासाठी लोककल्याण रोगनिदान संघाची टीम दिवसभर उपस्थित होती. जिल्हा समन्वयक Saurabh Dhandare यांच्यासह Mayur Pitale, Nikita Gayin, Shubham Lonare आणि Jayant Mangar यांनी रक्तनमुने संकलनाचे काम केले.



तपासणी करताना आरोग्य कर्मचारी


📢 महत्वाची बातमी:
चंद्रपुरात वाघाचा धुमाकूळ! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांचा मृत्यू

👉 संपूर्ण बातमी वाचा

यावेळी पोर्ला गावाच्या सरपंच निवृत्ताताई राऊत, ग्राम विकास अधिकारी निमगडे साहेब तसेच राऊत सर उपस्थित होते. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पुढेही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “निरोगी गाव, सुदृढ समाज” हा संदेश देत शिबिर पार पडले.


बॉडी चेकअप मशीन
🔥 फुल बॉडी चेकअप मशीनवर भारी ऑफर!
Quantum Resonance Magnetic Analyzer (QMA)
आता फक्त ₹7,800
₹12,990   40% OFF
✅ घरबसल्या फुल बॉडी हेल्थ चेकअप
✅ वापरण्यास सोपे मशीन
✅ EMI सुविधा उपलब्ध
👉 येथे क्लिक करून ऑफर पहा
* मर्यादित कालावधीसाठी ऑफर उपलब्ध
.
पोर्ला गावात मोफत रक्त तपासणी शिबिर कुठे आयोजित करण्यात आले होते?
हे शिबिर पोर्ला गावातील जुनी ग्रामपंचायत, जुनी वस्ती येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात कोणत्या रक्त तपासण्या करण्यात आल्या?
CBC, Sickle Cell, HPLC आणि Thalassemia या चार महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.
शिबिरात किती नागरिकांनी सहभाग घेतला?
या मोफत शिबिरात एकूण 134 नागरिकांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले.
शिबिराचे आयोजन कोणी केले होते?
लोककल्याण डायग्नोस्टिक आणि लोककल्याण रोगनिदान संघाच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!