✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २५ मे २०२६
![]() |
| घोट येथील वन विभागाच्या लाकूड डेपोला लागलेल्या भीषण आगीत शेकडो लाकूड बीट जळून खाक झाले. |
गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथे रविवारी सायंकाळी मोठी आग लागून वन विभागाच्या लाकूड डेपोचे प्रचंड नुकसान झाले. शेतात लागलेली आग वार्यामुळे एवढ्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच संपूर्ण डेपो ज्वाळांनी वेढला गेला. बघता बघता धुराचे मोठमोठे लोट आकाशात उठू लागले आणि परिसरात एकच धावपळ उडाली.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला शेतशिवारात आग लागली होती. मात्र जोराचा वारा असल्याने ती थेट वन विभागाच्या लाकूड डेपोपर्यंत पोहोचली. डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड साठवून ठेवले होते. आग लागताच लाकडांनी पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
चंद्रपुरात वाघाचा धुमाकूळ! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांचा मृत्यू
👉 पूर्ण माहिती वाचा
स्थानिकांच्या माहितीनुसार, या आगीत 350 हून अधिक लाकूड बीट जळून खाक झाले. यामध्ये जंगल कामगार संस्थेच्या लाकडाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर लाकडांचा अक्षरशः कोळसा झालेला दिसत होता. आग एवढी भडकली होती की जवळ जाणेही कठीण झाले होते.
आग विझवताना नागरिकांसह कर्मचार्यांची धावपळ
आगीची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बादल्या, पाण्याचे टँकर आणि अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. अनेक जण स्वतःहून मदतीला धावले. सायंकाळपासून सुरू झालेली धावपळ रात्रीपर्यंत सुरूच होती.
स्थानिकांमध्ये मात्र यानंतर संतापाचे वातावरण दिसून आले. एवढा मोठा लाकूड साठा असूनही वन विभागाकडे स्वतःचे अग्निशमन वाहन नसल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. वेळेत अधिक मदत मिळाली असती तर नुकसान कमी झाले असते, असे अनेक नागरिक बोलताना दिसले.
पोर्ला गावात मोफत रक्त तपासणी शिबिर; 134 नागरिकांनी केली तपासणी
👉 संपूर्ण बातमी वाचा
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही तासांच्या आगीत वन विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर वरिष्ठ अधिकारीही घोट येथे पोहोचले असून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.
Fire Starters Wax Cubes
घर, शेकोटी, कॅम्पिंग आणि आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी Fire Starter Cubes.


