कोटगल डॅमजवळ वैनगंगा नदीपात्रात ५५ ते ६० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 २६ मे २०२६

कोटगल डॅमजवळ वैनगंगा नदीपात्रात आढळलेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
कोटगल डॅम परिसरातील वैनगंगा नदीपात्रात ५५ ते ६० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.



ईश्वरजी तिवाडे कार्यकारी संपादक :- कोटगल डॅम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्ती अंदाजे ५५ ते ६० वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावकरी आणि नातेवाईक चिखली, निफद्रा घाट परिसरात आले होते. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच काही नागरिकांचे लक्ष नदीपात्रात पडलेल्या मृतदेहाकडे गेले. अचानक हा प्रकार दिसून येताच उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.

📢 महत्वाची बातमी:
गडचिरोलीत सकाळी धक्कादायक घटना; 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडला

👉 संपूर्ण बातमी वाचा


घटनास्थळी काही वेळातच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. मृत व्यक्ती नेमकी कोण आहे, तो इथे कसा आला, याबाबत परिसरात वेगवेगळे तर्क लावले जात होते. मात्र नेमकं काय झालं याची माहिती कुणालाच नव्हती.


निळी टी-शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अंगात निळ्या रंगाची टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती. नदीपात्रात मृतदेह दिसल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू झाली होती. गावामध्ये माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले होते.

📢 महत्वाची अपडेट:
घोटच्या वन विभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग; बघता बघता 350 हून अधिक बीट जळून खाक

👉 पूर्ण माहिती वाचा


या घटनेमुळे कोटगल डॅम आणि चिखली, निफद्रा घाट परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मृतदेह नेमका कुठून आला, पाण्यात वाहत आला की दुसरा काही प्रकार आहे, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

माहिती लिहेपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे परिसरात अजूनही या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!