पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज संपादकीय टीम 

 📅 २७ जानेवारी २०२६

पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य व नाट्य सादरीकरण
पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य व विविध कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली


पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज व देशभक्तीपर घोषणांसह गावातून फेरी काढून नागरिकांमध्ये देशप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या प्रभात फेरीमध्ये शिक्षकवृंद, शाळा समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.


यानंतर सायंकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मॅडम माननीय निवृत्ताताई राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामकृष्णजी बोरुले शाळा समिती अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी अशोकजी बोहरे ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील हितेंद्रजी बारसागडे, राजगोपाल गेडाम तंटामुक्ती अध्यक्ष, लिनाताई उंदीरवाडे ग्रामपंचायत सदस्य, यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित बातमी वाचा: पोरला प्रजासत्ताक दिन उत्सव – २६ जानेवारी २०२६


सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व विविध सादरीकरणातून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद


या कार्यक्रमाला शाळा समिती उपाध्यक्ष सौ. तेजस्विनी लिंगेश्वर भोयर, सदस्य श्री. चुडाराम पुनाजी कावळे, सौ. कविता महेश राऊत, श्री. संदिप मनोहर काळबांधे, सौ. ज्योत्सना संतोष लाडवे, श्री. रुपेश कवडू कलसार, सौ. जयश्री विजय कुमरे, श्री. सुधिर बाबुराव उरकुडे हे शाळा समिती सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मॅडम पौर्णिमा उराडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कुडकावार मॅडम यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!