पोर्ला येथे शाळा, ग्रामपंचायत व अमृत तलाव येथे विविध कार्यक्रमांत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Rambhau
0

✍️ लोकवाणी आवाज संपादकीय टीम 

📅 २६ जानेवारी २०२६

पोर्ला मराठी उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन
मराठी उच्च प्राथमिक शाळा पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी


पोर्ला येथे आज दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साडेसात वाजता मराठी उच्च प्राथमिक शाळा पोर्ला येथे माननीय रामकृष्णजी बोरुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मॅडम माननीय निवृत्ताताई राऊत, ग्रामसेवक निमगडे साहेब, पोलीस पाटील बारसागडे साहेब उपस्थित होते.


या कार्यक्रमास अशोकजी बोहरे ग्राम रोजगार सेवक पोर्ला, येवले सर माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, राऊत सर माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, कविताताई फरांडे माजी सरपंच, भोयर ताई उपाध्यक्ष जिल्हा परिषद शाळा समिती पोर्ला, संजयजी काळबांधे सदस्य शाळा समिती पोर्ला तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर फरांडे, परसरामजी बांबोडे, राजगोपाल गेडाम तंटामुक्ती अध्यक्ष, मनोज किरमिरे, प्यार मोहम्मद शेख,नीलकंठजी संदोकर, ईश्वरजी तिवाडे हे उपस्थित होते.

संबंधित बातमी वाचा: मंडई निमित्त पोरला शाळेत पाणपोई उपक्रम – जानेवारी २०२६


यानंतर शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला येथे माननीय दादाजी माधवराव साळवे साहेब यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. आर. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून एन. के. म्हाशाखेत्री, डॉक्टर राडे साहेब, बापूजी फरांडे, कविताताई फरांडे, ज्योत्स्नाताई जांभूळकर, पर्यवेक्षक बी. एच. तोडासे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.


शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम


शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांची परेड व ध्वजारोहण कार्यक्रम
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण व विद्यार्थ्यांची परेड


यानंतर इंदिरा गांधी चौक पोर्ला येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तथा अंगणवाडी चे बाल विद्यार्थी,  तसेच गावातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील ध्वजारोहण उपसरपंच सुजितजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.


इंदिरा गांधी चौक पोर्ला येथे उपसरपंच सुजित राऊत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
इंदिरा गांधी चौक पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त उपसरपंच सुजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करताना



त्यानंतर दरवर्षीप्रमाणे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. ही फेरी शेवटी ग्रामपंचायत पोर्ला येथे पोहोचली. ग्रामसचिवालयामध्ये सरपंच मॅडम निवृत्ताताई राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक निमगडे साहेब, उपसरपंच सुजितजी राऊत, अजय चापले, अशोकजी बोहरे, रवींद्रजी चापले तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच निवृत्ताताई राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण
ग्रामपंचायत पोर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच


यानंतर फॉरेस्ट अंतर्गत अमृत तलाव महोत्सव कार्यक्रमासाठी नवरगाव रोडलगत जंगलातील वनतलाव येथे ध्वजारोहण करण्यात आले. माजी सैनिक राकेशजी निशाने यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच मॅडम निवृत्ताताई राऊत, निमगडे साहेब, अजयजी चापले, अशोकजी बोहरे, रवींद्रजी सेलोटे, राजगोपाल गेडामजी रामकृष्णजी बोरुले,वनपरिक्षेत्र अधिकारी पोरला पाचभाई साहेब, धात्रक साहेब क्षेत्र साहेब पोर्ला, शिवणकर वनरक्षक, सहारे मॅडम वनरक्षक, रवीजी डहाले, देवाजी चापले, छत्रपती डहाले, मनोज म्हाशाखेत्री तसेच इतर फॉरेस्ट ऑफिस पोर्ला कर्मचारी व वनमजूर उपस्थित होते.

पोर्ला येथील नवरगाव रोडलगत अमृत तलाव वनपरिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक राकेशजी निशाने यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम
पोर्ला येथील अमृत तलाव वनपरिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक राकेशजी निशाने यांच्या हस्ते ध्वजारोहण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!