✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०६ फेब्रुवारी २०२६
![]() |
| पोरला गावाजवळील शेत परिसरात घडलेल्या घटनेनंतरचे घटनास्थळाचे दृश्य |
पोरला गावात आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. पोरला ते कुडेसावली रोड लगत सरकारी सरोवर त्याला सराड म्हणूनही ओळखल्या जाते त्याच्या लगत त्याच्या जवळ शेती असलेले शेतामध्ये गिरधरजी कोलते (वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, रा. पोरला) यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले असून शेतकरी कुटुंबांमधील ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, गिरधरजी कोलते दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. काही वेळानंतर त्यांचे लहान भाऊ नीलकंठ कोलते शेतात पोहोचले असता त्यांना घटना दिसून आली. त्यानंतर तात्काळ पोलीस पाटील हितेंद्रजी बारसागडे व संबंधित पोलीस यंत्रणांना यांना माहिती दिली .
संबंधित बातमी वाचा: पोरला बाइक अपघात – व्यक्ती ठार, गडचिरोली बातमी
माहिती मिळताच मोहिते साहेब आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथे हलवण्यात आला. पुढील प्रक्रिया संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर नापिकीचा वाढता ताण
प्रत्यक्ष चौकशीदरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सततची नापिकी, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक ताण यामुळे गिरधरजी कोलते मानसिक दबावात होते, अशी चर्चा आहे. ग्रामीण भागातील शेतीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी ही परिस्थिती किती गंभीर बनत चालली आहे, याचे हे उदाहरण मानले जात आहे.
गिरधरजी कोलते यांच्या पश्चात मुलगा, मुलगी तसेच नातवंडांसह मोठा परिवार आहे. शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
लोकवाणी तर्फे प्रत्यक्ष चौकशीदरम्यान असे जाणवले की, सततची नापिकी आणि आर्थिक अस्थिरता हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोरील गंभीर प्रश्न बनत चालला आहे. या घटनेने त्या वास्तवाकडे पुन्हा लक्ष वेधले असून शेतकरी कुटुंबांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

