आमदार डॉ. मिलिंद नरोटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पोरला शाळेत विद्यार्थ्यांना वहीबुक वाटप

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 01 आगस्ट  2026

पोरला शाळेत विद्यार्थ्यांना वहीबुक वाटप
पोरला शाळेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त वहीबुक वाटप


गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, पोरला येथे आज (दि. १ ऑगस्ट) विद्यार्थ्यांना वहीबुकांचे वाटप करण्यात आले. आमदार नरोटे साहेब यांचा वाढदिवस ३० जुलै रोजी होता. मात्र शाळेला सुट्टी आणि सततच्या पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

📢 महत्वाची बातमी:
पोरला शाळेत जागतिक योग दिन उत्साहात; विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी एकत्र केली योगासने

👉 संपूर्ण बातमी वाचा


कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वहीबुकांचे वाटप करण्यात आले. नवीन वहीबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी छोटासा हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पोरला शाळेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त वहीबुक वाटप


यावेळी भाजपा तालुका महामंत्री लोमेशजी कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्णजी बोरुले, भाजपा बूथ प्रमुख बंटी उपासे, मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फुलझले सर, रामटेके सर, कुडकावार मॅडम, सहारे मॅडम, राजकोंडावार मॅडम, मोतकुलवार मॅडम, भडांगे मॅडम तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 महत्वाची बातमी:
लोक आंदोलन न्यासचा इशारा; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्या, अन्यथा गडचिरोलीत तीव्र आंदोलन

👉 संपूर्ण बातमी वाचा


कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वहीबुकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार प्रदर्शन कुडकावार मॅडम यांनी केले. शेवटी उपस्थितांनी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

पोरला शाळेत वहीबुक वाटपाचा कार्यक्रम कधी झाला?
मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, पोरला येथे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांना वहीबुकांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम कोणाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला?
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
३० जुलैऐवजी १ ऑगस्ट रोजीच कार्यक्रम का घेण्यात आला?
शाळेला सुट्टी तसेच सततच्या पावसामुळे ३० जुलै रोजी कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना वहीबुकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला कोणकोण उपस्थित होते?
भाजपा तालुका महामंत्री लोमेशजी कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्णजी बोरुले, भाजपा बूथ प्रमुख बंटी उपासे, मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे मॅडम, शिक्षकवृंद तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!