पोरला शाळेत जागतिक योग दिन उत्साहात; विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी एकत्र केली योगासने

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 २१ जून २०२६


पोरला येथील मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी एकत्र योगासने करताना
पोरला शाळेत जागतिक योग दिन उत्साहात; विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी एकत्र योगासने करत सहभाग घेतला.


मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, पोरला येथे २१ जून २०२६ रविवार ला  जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या आवारात शिक्षकांनी विविध योगासने व व्यायाम करून दाखवत विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घेतला. यावेळी योगाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होते. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने योगासने करत कार्यक्रमात सहभाग घेतला.

📢 महत्वाची अपडेट:
पोरला अंगणवाडीत अन्नप्राशन दिवस उत्साहात; चिमुकल्यांच्या पहिल्या घासाचा सोहळा संपन्न

👉 पूर्ण माहिती वाचा


यावेळी गावच्या सरपंच सौ. निवृत्तीताई राऊत, ग्रामविकास अधिकारी निमगडे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्णजी बोरुले, शाळा समिती सदस्य संजयजी काळबांधे, मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे मॅडम, शिक्षकवृंद रामटेके सर, फुलझले सर, सहारे मॅडम, राजकोंडावार मॅडम, भडांगे मॅडम, अंगणवाडी सेविका किनेकार मॅडम, ढवळे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी रोशनजी शिवणकर, अजय टेंभुर्णे तसेच पोरला स्वस्त धान्य केंद्राचे संचालक सुनील भनारकर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांसोबत मान्यवरांनीही केली योगासने

विद्यार्थी व मान्यवर योगासन करताना

मान्यवर व विद्यार्थी एकत्र योग आसन करताना


योग दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी एकत्र योगासने करत सहभाग घेतला. सर्वांनी मनापासून सहभाग घेतल्याने शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

📢 महत्वाची बातमी:
नारायणापूरच्या शेकडो शेतकऱ्यांचे धान अडकले; संतप्त शेतकऱ्यांचा तहसीलदारांना इशारा, वेळेत खरेदी नाही तर चक्का जाम

👉 संपूर्ण बातमी वाचा


कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली. त्यानंतर सर्वांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


बच्चो के स्कूल बॅग इमेज

🎒 स्पेशल स्कूल बॅग कॉम्बो ऑफर

✅ 70% पर्यंत सूट
✅ मर्यादित कालावधीसाठी ऑफर
✅ मुला-मुलींसाठी आकर्षक डिझाईन
✅ घरपोच डिलिव्हरी सुविधा

🛒 ऑफर पाहा

⏳ स्टॉक उपलब्ध असेपर्यंत ऑफर लागू.

.
पोरला शाळेत जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात आला?
२१ जून २०२६ रोजी मराठी उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, पोरला येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात कोणकोण सहभागी झाले होते?
विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाळा समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच उपस्थितांनी योगासनांमध्ये सहभाग घेतला.
योग दिनानिमित्त काय करण्यात आले?
शिक्षकांनी योगासने व व्यायाम करून दाखवत विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घेतला. यावेळी योगाचे महत्त्वही सांगण्यात येत होते.
कार्यक्रमानंतर काय करण्यात आले?
कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!