✍️लोकवाणी आवाज टिम
📅 ८ जुनं २०२६
![]() |
| पोरला अंगणवाडी क्रमांक 517 येथे अन्नप्राशन दिनानिमित्त बालकांचा पूरक आहार प्रारंभ सोहळा |
पंकज येवले जिल्हा प्रतिनिधी:- पोरला येथील अंगणवाडी क्रमांक 517 मध्ये सोमवारी (8 जून) अन्नप्राशन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सहा महिने पूर्ण झालेल्या चिमुकल्यांच्या पहिल्या पूरक आहाराच्या सुरुवातीचा हा विशेष सोहळा असल्याने माता आणि कुटुंबीयांनीही आनंदाने सहभाग घेतला.
यावेळी अन्यया अकुंश सोनटक्के, मोक्षदा महेश संदोकर आणि प्रांश पंकज येवले या बालकांचा अन्नप्राशन सोहळा पार पडला. चिमुकल्यांच्या निरोगी वाढीसाठी सहा महिन्यांनंतर पूरक आहाराचे महत्त्व काय आहे, याबाबत उपस्थित मातांना माहिती देण्यात आली.
पोर्ल्यात प्रथमच साजरी होणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती;
👉 पूर्ण माहिती वाचा
बालकांना दिवसातून सात ते आठ वेळा मऊसर व घट्ट पूरक आहार द्यावा, तसेच त्यासोबत नियमित स्तनपान सुरू ठेवावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. लहान वयातील योग्य आहारामुळे बालकांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले.
चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी मातांना महत्त्वाच्या सूचना
कार्यक्रमादरम्यान गरोदर माता आणि स्तनदा मातांनाही मार्गदर्शन करण्यात आले. नियमित लसीकरण, पौष्टिक आहार आणि स्वच्छतेच्या सवयी यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या बाबींकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गरोदर व स्तनदा माता उपस्थित होत्या. चिमुकल्यांची वाढ निरोगी आणि सक्षम व्हावी यासाठी अशा उपक्रमांचा निश्चितच फायदा होत असल्याची भावना उपस्थित मातांनी व्यक्त केली.
अखेर पावसाची प्रतीक्षा संपली! केरळमध्ये मॉन्सूनची दमदार एंट्री; महाराष्ट्राकडेही वाटचाल सुरू
👉 संपूर्ण बातमी वाचा
कार्यक्रमाच्या आयोजनात शालिनी आखाडे, आशा वर्कर मंदा शामकुळे, आशा वर्कर सविता साखरे, पौर्णिमा संदोकर, राखी येवले, वैष्णवी पाल आणि तेजस्विनी सोनटक्के यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बेबी सिपर कप
6+ महिन्यांच्या बालकांसाठी योग्य • गळतीरोधक डिझाइन • BPA Free • दोन्ही बाजूंना हँडल
बाळाच्या आहाराची सुरुवात अधिक सोपी आणि सुरक्षित बनवा.
🛒 आत्ताच खरेदी करा


