✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०९ जून २०२६
![]() |
| हातपंप बंद असल्याने नारायणपूर गावात पाणी भरण्यासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा. |
सिरोंचा, प्रतिनिधी :- सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर अंतर्गत येणाऱ्या गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील हातपंप अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हातपंप बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना सध्या एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अखेर पावसाची प्रतीक्षा संपली! केरळमध्ये मॉन्सूनची दमदार एंट्री; महाराष्ट्राकडेही वाटचाल सुरू
👉 पूर्ण माहिती वाचा
काही ठिकाणी जनरेटरच्या मदतीने पाणी काढून नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे संपूर्ण गावाची गरज भागत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून याकडे दुर्लक्ष करू नये, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत नारायणपूरचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी तातडीने लक्ष देऊन बंद पडलेल्या हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हातपंप तातडीने सुरू करण्याची मागणी
📢 महत्वाची बातमी:
पोरला अंगणवाडीत अन्नप्राशन दिवस उत्साहात; चिमुकल्यांच्या पहिल्या घासाचा सोहळा संपन्न
👉 संपूर्ण बातमी वाचा
पोरला अंगणवाडीत अन्नप्राशन दिवस उत्साहात; चिमुकल्यांच्या पहिल्या घासाचा सोहळा संपन्न
👉 संपूर्ण बातमी वाचा
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रोज धावपळ करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित विभागाने त्वरित कारवाई करून हातपंप सुरू करावा आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हातपंपाची दुरुस्ती नेमकी कधी होणार आणि गावकऱ्यांची पाण्याची अडचण कधी दूर होणार, याकडे आता नारायणपूरकरांचे लक्ष लागले आहे.

