✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०४ जून २०२६
![]() |
| केरळमध्ये अखेर मॉन्सून दाखल; पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातही पावसाची जोरदार चाहूल लागण्याची शक्यता. |
यंदा उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सूनने ४ जून रोजी केरळमध्ये अधिकृत एंट्री केली आहे. नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने आलेला मॉन्सून आता पुढील वाटचालीला सुरुवात करत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून सध्या केरळ, माहे, लक्षद्वीप तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून केरळमध्ये चांगला पाऊस सुरू असून काही ठिकाणी मुसळधार सरीही कोसळल्या आहेत.
महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल! ६ जूनच्या आसपास कोकणात एन्ट्रीची शक्यता; विदर्भात मात्र उष्णतेचा तडाखा कायम
👉 पूर्ण माहिती वाचा
मॉन्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रात पावसाळी ढगांची संख्या वाढणे, पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढणे आणि केरळमध्ये सर्वदूर पाऊस होणे या गोष्टींमुळे अखेर मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब झाले.
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी
आता महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष मॉन्सूनच्या पुढील प्रवासाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाची हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेतून नाव कमी झालं? महिलांसाठी मोठा दिलासा; पैशांबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
👉 संपूर्ण बातमी वाचा
खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात आहे. वेळेवर पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता पावसाबाबत उत्सुकता वाढली आहे.
सामान्यतः मॉन्सून १ जूनला केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा तो ४ जून रोजी दाखल झाला आहे. तरीही पुढील काही दिवसांत त्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा आता फार काळ राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
🌧️ पावसाळ्यासाठी मजबूत रेनकोट
पावसाळ्यात प्रवास, शेतीची कामे किंवा दैनंदिन वापरासाठी उपयुक्त रेनकोट. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आजच पाहा.
👉 किंमत व ऑफर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

