✍️लोकवाणी आवाज टिम
📅 ०२ जून २०२६
![]() |
| लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित प्रतिनिधिक छायाचित्र |
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेची छाननी सुरू असताना अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी झाल्याने राज्यभरात चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, आधी खात्यात जमा झालेले पैसे आता परत द्यावे लागणार का, याची चिंता अनेक महिलांना लागून राहिली होती.
मात्र आता या चर्चांवर काही प्रमाणात पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी मिळालेली रक्कम परत वसूल केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यात विलंब; डिसेंबरमध्ये दोन हप्ते येण्याची शक्यता वाढली
👉 पूर्ण माहिती वाचा
योजनेच्या पडताळणीदरम्यान अनेक अर्जांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याचे समोर आले. काही ठिकाणी कागदपत्रांची कमतरता, काही ठिकाणी चुकीची माहिती तर काही प्रकरणांमध्ये पात्रतेशी संबंधित बाबी आढळल्याने अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
KYC आणि कागदपत्रांच्या त्रुटींना मिळू शकते आणखी एक संधी
छाननीदरम्यान अनेक महिलांच्या अर्जात केवळ तांत्रिक स्वरूपाच्या चुका असल्याचेही निदर्शनास आले आहे. KYC पूर्ण न होणे, कागदपत्रे अपुरी असणे किंवा माहिती भरताना झालेल्या किरकोळ चुका यामुळे काही महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.
अशा महिलांसाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे. KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक कारणांमुळे लाभापासून दूर गेलेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
पोर्ल्यात प्रथमच साजरी होणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
👉 संपूर्ण बातमी वाचा
दरम्यान, लाभार्थी यादीची पडताळणी अद्याप सुरू असून पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे. यासंदर्भातील पुढील निर्णय आणि अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतर संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
सध्या तरी नाव कमी झालेल्या किंवा KYC संदर्भात अडचण असलेल्या महिलांसाठी ही माहिती दिलासादायक मानली जात असून, राज्यातील लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.
दैनंदिन वापर, प्रवास, ऑफिस किंवा खास कार्यक्रमांसाठी उपयुक्त स्टायलिश महिला हँडबॅग. आकर्षक डिझाईन आणि किफायतशीर किंमतीमुळे महिलांमध्ये पसंतीचा पर्याय.
✔ दैनंदिन वापरासाठी योग्य
✔ हलकी आणि सोयीस्कर
✔ महिलांसाठी उत्तम पर्याय


