✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १४ जुलाई २०२६
![]() |
| पोरला येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करताना उपस्थित मान्यवर व शिक्षकवृंद |
पोरला, १४ जुलै २०२६ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पोरला येथील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.
नवीन नोटबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षणासाठी लागणारे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मन लावून अभ्यास करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोरला येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. मनोहरजी नवघडे सर, दीपकजी चुधरी माजी सरपंच, अशोकजी बोहरे ग्रामपंचायत सदस्य तथा ग्राम रोजगार सेवक, भास्करजी मेश्राम माजी तंटामुक्ती अध्यक्ष, रामकृष्णजी बोरुले शाळा समिती अध्यक्ष, अनिलजी चापले ग्रामपंचायत सदस्य तथा माझी शाळा समिती अध्यक्ष, प्यार महम्मद शेख सामाजिक कार्यकर्ता, उमेशजी आखाडे उमेद कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता, संजयजी पोटे तसेच शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे मॅडम यांच्यासह फुलझले सर, सहारे मॅडम, रामटेके सर आणि शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले.
यावेळी मनोहरजी नवघडे सर यांनी अध्यक्षस्थानावरून खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या जीवनातील संघर्ष आणि सामाजिक कार्याचा उल्लेख केला. संघर्षातून पुढे येत त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाची माहिती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दीपकजी चुधरी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा उरांडे मॅडम यांच्या छोटेखानी प्रस्तावनेने झाली. त्यानंतर
कार्यक्रमाची सूत्रसंचालन अशोकजी बोहरे ग्रामपंचायत सदस्य तथा ग्राम रोजगार सेवक यांनी केली. त्यांनी उपक्रमामागील उद्देश सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम पोरला येथे कौतुकाचा विषय ठरला.

