✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 22 एप्रिल 2026
![]() |
| कात्रटवार कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित SIR संदर्भातील बीएलए प्रमुखांची ट्रेनिंग. |
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर SIR प्रक्रियेला वेग आला असून, त्यासाठी शिवसेना गडचिरोली जिल्ह्यानेही संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता गडचिरोली येथील कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलए प्रमुखांची महत्त्वाची ऑनलाइन ट्रेनिंग घेण्यात आली. यावेळी SIR प्रक्रियेत बीएलएंनी कोणती जबाबदारी पार पाडायची, मतदार यादीच्या कामात कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यायचे आणि निवडणुकीपूर्वीची तयारी कशी ठेवायची, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
गडचिरोलीत शिवसेनेची कार्यकारी आढावा बैठक; मनिषा कायंदे यांचे BLA, बूथ प्रमुख व पक्ष बळकटीवर भर.
👉 संपूर्ण बातमी वाचा
ट्रेनिंगसोबतच पक्षप्रवेशाचाही कार्यक्रम पार पडला. विविध भागांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची धुरा अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे कार्यक्रमात संघटनात्मक तयारीबरोबरच नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमात शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख हेमंतभाऊ जांबेवार, महिला संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे, जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे यांच्यासह विविध सेलचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट! १४,३१४ ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर.
👉 पूर्ण माहिती वाचा
-


