✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २७ एप्रिल २०२६
![]() |
| गडचिरोलीतील पीएसआर हॉलमध्ये शिवसेना आढावा बैठकीत मनिषा कायंदे यांचे मार्गदर्शन करतानाचे दृश्य |
गडचिरोली : शहरातील पी.एस.आर. हॉल, चंद्रपूर रोड (महिला महाविद्यालयाजवळ) येथे 26 एप्रिल 2026 रोजी शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीला पूर्व विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख तथा शिवसेना सचिव व प्रवक्त्या मनिषा ताई कायंदे तसेच गडचिरोली लोकसभा संपर्कप्रमुख जगदीशजी गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात पक्ष मजबूत करायचा असेल तर तळागाळात काम वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी पक्षाचे काम काय असते हेही सोप्या भाषेत सांगितले. लोकांच्या अडचणी ऐकून घेणे, त्यांना मदत करणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्षाची भूमिका गावागावात सांगणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीत शिवसेनेची आढावा बैठक; मतदार यादी पारदर्शकतेसोबत पदाधिकाऱ्यांची निवड
👉 संपूर्ण बातमी वाचा
तसेच ‘BLA’ यांचे बद्दलही माहिती देण्यात आली. मतदार यादी तपासणे, नवीन मतदारांची नोंद ठेवणे, नावात काही चूक असेल तर दुरुस्ती करणे आणि निवडणुकीत पक्षासाठी काम करणे ही BLA ची मुख्य कामे असल्याचे सांगण्यात आले.
बूथस्तरावर काम वाढवण्यावर भर
बूथ प्रमुखांच्या कामावरही विशेष भर देण्यात आला. प्रत्येक मतदान केंद्रावर लोकांशी संपर्क ठेवणे, मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी आणणे आणि पक्षाशी जोडून ठेवणे हे बूथ प्रमुखांचे महत्त्वाचे काम असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला हेमंत भाऊ जम्बेवार (सहसंपर्क प्रमुख), वर्षाताई मोरे (महिला संपर्कप्रमुख), राकेशजी बेलसरे (जिल्हाप्रमुख), सुरेंद्र सिंह चंदेल (माजी जिल्हाप्रमुख), छायाताई कुंभारे, पुंडलिकजी येवले (ओबीसी व्हिजन्टी जिल्हाप्रमुख), संदीपजी कोरेत, दिपक भारसाकडे (युवासेना प्रमुख), वसंतजी गावतुरे (तालुकाप्रमुख), पोर्णिमा इस्टाम (महिला जिल्हाप्रमुख), श्रीदेवी वरघंटीवार (महिला जिल्हाप्रमुख), सुनिता कोकेरवार (ओबीसी व्हिजन्टी महिला जिल्हाप्रमुख), ज्योतीताई सोनकुसरे (ओबीसी व्हिजन्टी महिला उपजिल्हाप्रमुख) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीत शिवसेनेचे धरणे आंदोलन; महिला आरक्षणावरून विरोधकांविरोधात निषेध
👉 पूर्ण माहिती वाचा
यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. मनिषा ताई कायंदे आणि जगदीशजी गुप्ता यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा दुपट्टा घालून प्रवेश देण्यात आला. त्यामुळे बैठकीत उत्साहाचे वातावरण होते.
या बैठकीतून येणाऱ्या काळात बूथ स्तरावर काम वाढवण्याचा आणि पक्ष अधिक मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला..




