भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची निवड

Rambhau
0

  ✍️ लोकवाणी आवाज टिम 

📅 २७ एप्रिल २०२६

गडचिरोली सर्किट हाऊस येथे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीनंतर प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांचा सत्कार
भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांचा सत्कार


गडचिरोली (दि. २५ एप्रिल २०२६):

भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

ही नियुक्ती भाजपा आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या अनुमतीने आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांनी ही निवड जाहीर केली.

📢 महत्वाची अपडेट:
गडचिरोलीत शिवसेनेचे धरणे आंदोलन; महिला आरक्षणावरून विरोधकांविरोधात निषेध

👉 पूर्ण माहिती वाचा

सर्किट हाऊस येथे सन्मान सोहळा पार पडला 

याप्रसंगी गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते प्रा. सुरपाम यांना पक्षाचा दुपट्टा घालून व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


देवराव होळी सोबत


कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महामंत्री विनय मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते तसेच डॉ. चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

📢 महत्वाची बातमी:
गडचिरोलीत शिवसेनेची आढावा बैठक; मतदार यादी पारदर्शकतेसोबत पदाधिकाऱ्यांची निवड

👉 संपूर्ण बातमी वाचा

दरम्यान, प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्याचे भाजपा अनु जमाती मोर्चा चे अध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार कृष्णा गजबे, डॉ. नामदेव उसेंडी, महामंत्री प्रकाश गेडाम, महामंत्री विनय मडावी यांना दिले आहे. त्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली?
त्यांची भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती कोणाच्या आदेशानुसार झाली?
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
सन्मान सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता?
गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात कोण-कोण उपस्थित होते?
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विनय मडावी, डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!