✍️लोकवाणी आवाज टिम
📅२० ऑगस्ट २०२६
![]() |
| पोरला येथे २० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेचे दृश्य |
पोरला येथे आज दिनांक २० ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत गावातील विविध महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले. शेत पांदन रस्ते, मागील ग्रामसभेत घेण्यात आलेले ठराव, घरकुलाची प्रतीक्षा यादी यासह इतर स्थानिक प्रश्नांवर ग्रामस्थांनी चर्चा केली. या ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी गावातील जल जीवन मिशनच्या कामाचाही मुद्दा ग्रामसभेत पुढे आला. जल जीवन मिशनचे काम अद्याप अपुरे असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. हे काम अपुरे ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
पोर्ल्यातील धावडी बरड लेंडी नाला शेत पांदन रस्त्याचे काम आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील सुविधांचा प्रश्न; आमदार नरोटे साहेब यांना निवेदन
👉 संपूर्ण बातमी वाचा
ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून अशोकजी बोहरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ईश्वरजी तीवाडे, उपाध्यक्षपदी विश्वनाथजी म्हशाखेत्री
ग्रामसभेदरम्यान तंटामुक्ती समितीची नवीन कार्यकारिणी देखील निवडण्यात आली. यामध्ये ईश्वरजी तीवाडे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पोरला गावात पहिल्यांदाच तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली असून, या पदावर विश्वनाथजी म्हशाखेत्री यांची बिनविरोध निवड झाली.
गावातील आपापसातील वाद-विवाद सामोपचाराने सोडवणे, गावात शांतता आणि सलोखा कायम ठेवणे तसेच सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वाची असते. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून गावातील प्रश्न आणि तंटे सामंजस्याने सोडवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
मुलचेरा नगरपंचायतीवर नागरिकांचा मोर्चा; पाणी, रस्ते, आरोग्याच्या समस्यांवर नगरसेविकांचा संताप
👉 पूर्ण माहिती वाचा
ग्रामसभेत शेत पांदन रस्ते, घरकुल प्रतीक्षा यादी, मागील ठराव आणि जल जीवन मिशनच्या अपुऱ्या कामाचा मुद्दा मांडण्यात आला. विशेषतः जल जीवन मिशनचे काम पूर्ण करण्याबाबत आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी पुढे आली. आता या सर्व मुद्द्यांवर पुढील कार्यवाही काय होते, याकडे पोरला ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

