✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १८ ऑगस्ट २०२८
![]() |
| मुलचेरा नगरपंचायतीसमोर नागरिकांसोबत नगरसेविका सुनीताताई श्रीनिवास कोकेरवार; पाणी, रस्ते आणि आरोग्याच्या समस्यांबाबत प्रशासनाकडे मागणी |
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा नगरपंचायतीच्या हद्दीत पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विविध समस्यांकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची खंत नगरसेविका मा. सौ. सुनीताताई श्रीनिवास कोकेरवार यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या विविध समस्या मांडण्यासाठी तसेच मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना जाब विचारण्यासाठी सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी मा. सौ. सुनीताताई श्रीनिवास कोकेरवार काही नागरिकांना सोबत घेऊन मुलचेरा नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या पाणी, रस्ते आणि आरोग्याशी संबंधित अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
पोर्ल्यातील धावडी बरड लेंडी नाला शेत पांदन रस्त्याचे काम आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील सुविधांचा प्रश्न; आमदार नरोटे साहेब यांना निवेदन
👉 पूर्ण माहिती वाचा
पाणी, रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासनावर रोष
सत्तेत असूनही नागरिकांना योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर मा. सौ. सुनीताताई श्रीनिवास कोकेरवार यांनी रोष व्यक्त केला. विशेषतः मुलचेरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. तांबे सर हे नागरिकांच्या पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या या समस्या तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
मुलचेरा नगरपंचायतीच्या नागरिकांना योग्य सुविधा मिळण्यासाठी सध्याचे मुख्याधिकारी श्री. तांबे यांना तत्काळ मुख्याधिकारी पदावरून हटवून त्यांच्या जागी कार्यक्षम मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी मा. सौ. सुनीताताई श्रीनिवास कोकेरवार यांनी केली आहे.
गडचिरोलीत शिवसेनेचा जोरदार मेळावा; युवा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, जिल्हाभरातून शिवसैनिकांची उपस्थिती
👉 संपूर्ण बातमी वाचा
यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. ना. ॲड. आशिषजी जयस्वाल साहेब यांच्याकडेही मागणी केल्याचे समजते. त्यामुळे आता मुलचेरा नगरपंचायत प्रशासन या नागरिकांच्या प्रश्नांवर काय भूमिका घेते आणि पाणी, रस्ते व आरोग्याच्या समस्या कधी सोडवल्या जातात, याकडे मुलचेरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

