📅 १३ ऑगस्ट २०२६
![]() |
| गडचिरोली येथील सुमांनद हॉलमध्ये झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. |
गडचिरोली शहरात गुरुवारी (१३ ऑगस्ट) शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. युवा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यानंतर जिल्हा शिवसेना कार्यकर्ता चर्चा बैठक व मार्गदर्शन मेळावा सुमांनद हॉल येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातून शिवसेनेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब, उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, विदर्भ शिवसेना संघटक किरणजी पांडव साहेब आणि शिवसेना सचिव तथा विदर्भ संपर्कप्रमुख आमदार मनीषाताई कायंदे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
📢 महत्वाची बातमी:
पोर्ल्यातील धावडी बरड लेंडी नाला शेत पांदन रस्त्याचे काम आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील सुविधांचा प्रश्न; आमदार नरोटे साहेब यांना निवेदन
👉 संपूर्ण बातमी वाचा
युवा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्ता चर्चा बैठक घेण्यात आली. या बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमधून विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सुमांनद हॉलमध्ये शिवसैनिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.पोर्ल्यातील धावडी बरड लेंडी नाला शेत पांदन रस्त्याचे काम आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील सुविधांचा प्रश्न; आमदार नरोटे साहेब यांना निवेदन
👉 संपूर्ण बातमी वाचा
गडचिरोलीत शिवसेनेचा शिवसैनिक मेळावा; पदाधिकारी आणि कार्यकर्तची नेत्यांची उपस्थिती
मेळाव्यात आशिषजी जयस्वाल साहेब, उदयजी सामंत साहेब, किरणजी पांडव साहेब आणि आमदार मनीषाताई कायंदे मॅडम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाषण केलं. पक्षाचं काम गावागावात पोहोचवणं, कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणं आणि जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत करण्यावर नेत्यांनी भर दिला.
मनीषाताई कायंदे यांनी आपल्या भाषणात बूथपातळीवरील संघटन मजबूत ठेवण्याचा मुद्दा मांडला. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करणं आणि बीएलएच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क कायम ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांनी तळागाळात सक्रिय राहून पक्षाचं काम पुढे नेण्याचा विषयही त्यांच्या भाषणातून समोर आला.
आशिषजी जयस्वाल, उदयजी सामंत आणि किरणजी पांडव यांच्या भाषणातूनही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून पक्षाचं संघटन अधिक मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला. प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
या कार्यक्रमाला गडचिरोली सहसंपर्कप्रमुख हेमंत भाऊ जंम्बेवार साहेब, महिला संपर्कप्रमुख वर्षा ताई मोरे, गडचिरोली जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे, विधानसभा आरमोरी जिल्हाप्रमुख संदीप भाऊ ठाकूर, महिला जिल्हाध्यक्षा श्रीदेवी वरघंटिवार, युवा सेना जिल्हाप्रमुख दिपक भाऊ भारसागडे, महिला जिल्हासंघटिका पौर्णिमा ताई ईस्टाम, गडचिरोली लोकसभा प्रमुख सुरेंद्र भाऊ चंदेल, महिला लोकसभा प्रमुख छाया ताई कुंभारे, गडचिरोली तालुका प्रमुख वसंत भाऊ गावतुरे आणि ओबीसी, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष पुंडलिकजी येवले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
📢 महत्वाची अपडेट:
SIR साठी शिवसेनेची जोरदार तयारी; गडचिरोलीत बीएलए प्रमुखांची महत्त्वाची ट्रेनिंग, पक्षप्रवेशानेही वाढले बळ
👉 पूर्ण माहिती वाचा
SIR साठी शिवसेनेची जोरदार तयारी; गडचिरोलीत बीएलए प्रमुखांची महत्त्वाची ट्रेनिंग, पक्षप्रवेशानेही वाढले बळ
👉 पूर्ण माहिती वाचा
जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून आलेल्या महिला पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमुळे मेळाव्याला चांगलीच रंगत आली. आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचं एकत्रित चित्र या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.
मार्गदर्शन आणि चर्चा बैठकीनंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
युवा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, प्रमुख नेत्यांची भाषणं आणि पक्ष प्रवेश यामुळे गडचिरोलीतील शिवसेनेचा हा मेळावा उत्साहात पार पडला.


