गडचिरोली–पोरला रोडवर वाढत्या ट्रॅफिकमध्ये टू व्हीलरचा अपघात; चालक गंभीर, सहप्रवासी बचावला

Rambhau
0

 ✍️ लोकवाणी आवाज 

 📝 ०५ डिसेंबर २०२५

गडचिरोली–पोरला मुख्य मार्गावर गेल्या काही काळापासून रोजची वाहतूक सतत वाढत आहे. या मार्गावर अनेक वेळा वाहनांची अचानक गर्दी, वेगवान दुचाकी आणि चारचाकी यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. याच मार्गावर, निंबाळकर पेट्रोल पंपापासून काही अंतरावर, ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरगावकडे जात असलेल्या संजय मेश्राम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना ट्रॅफिकमुळे नियंत्रण गमावले. रस्त्यावर घसरल्यामुळे ते गंभीर जखमी झाले, तर मागे बसलेला सचिन सहारे थोडक्यात बचावला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोन्ही जखमींना पोरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात हलवले.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, गडचिरोली–पोरला मार्गावर रोजची वाहतूक याआधीपेक्षा जास्त वाढली आहे, आणि अचानक येणारी वाहनांची संख्या, वेगवान दुचाकी व चारचाकी यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. या घटनेनंतर या रोडवरील वाहतुकीच्या समस्येची गंभीरता पुन्हा स्पष्ट झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!