✍️ लोकवाणी आवाज
📝 ६ डिसेंबर २०२५
विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सच्या शानदार विजयासह मालिका आपल्या नावे केली. प्रतिस्पर्ध्यांनी दिलेल्या 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच भक्कम पाया रचला.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. रोहितने 75 धावांची प्रभावी खेळी साकारली. त्यानंतर यशस्वीने नाबाद 116 धावा करत विजयाची जबाबदारी खांद्यावर घेतली. शेवटच्या क्षणी विराट कोहली मैदानात आला आणि दोन दमदार चौकारांसह भारताचा विजय निश्चित केला. विराट 65 धावांवर नाबाद राहिला. या विजयामुळे भारताने मालिका 2–1 ने जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले.
मालिकेत विराट कोहलीची धडाकेबाज कामगिरी
विराटने या तीन सामन्यांच्या मालिकेत 151 च्या उत्तुंग सरासरीने 302 धावा जमवत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या बॅटमधून 24 चौकार आणि 12 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या भव्य कामगिरीच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले.
इतकेच नव्हे तर या पुरस्कारासह विराटने क्रिकेट इतिहासात नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘Player of the Series’ जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला, अशा प्रकारे त्याने सचिन तेंडुलकरचा (19) विक्रम मागे टाकला.
वनडेत कोहलीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा
वनडेमधील विराटचा हा 11 वा POTS (मॅन ऑफ द सिरीज)
सर्व स्वरूपातील क्रिकेट एकत्रित केल्यास त्याचा हा 20 वा पुरस्कार
या यादीत तो एकमेव सक्रिय आंतरराष्ट्रीय खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक POTS जिंकणारे खेळाडू
विराट कोहली – 20
सचिन तेंडुलकर – 19
शाकिब अल हसन – 17
जॅक कॅलिस – 14
सनथ जयसूर्या – 13
या यादीत विराट आणि सचिन ही भारतीय नावं सर्वात वर दिसतात.
तिसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने 116 धावा करत सामनावीर ठरला, तर संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीराचा मान मिळाला.

