✍️ लोकवाणी आवाज टिम
📅०३ फेब्रुवारी २०२६
![]() |
| शिष्यवृत्ती परीक्षा 2026: इयत्ता 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 26 एप्रिलला परीक्षा; ऑनलाईन अर्जाची मुदत 13 फेब्रुवारीपर्यंत वाढ (प्रतीकात्मक फोटो) |
मुंबई, दि. ३ – राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) 26 एप्रिल 2026 रोजी एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी शाळा नोंदणी तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शाळा माहिती प्रपत्र, विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे अनेक शाळा व पालकांना अर्ज प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. विशेषतः अंतिम टप्प्यात नोंदणी करणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे.
सुधारित वेळापत्रक: नियमित शुल्क ते अतिविशेष विलंब शुल्क
संबंधित बातमी वाचा: शिष्यवृत्ती परीक्षा 2026 – इयत्ता 4 थी व 7 वीची परीक्षा, अर्ज प्रक्रिया सुरू
परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह 14 ते 20 फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह 21 ते 24 फेब्रुवारी, तर अति विशेष विलंब शुल्कासह 25 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही. त्यामुळे संबंधित शाळांनी व पालकांनी अंतिम तारखांचा विचार करून वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 4 थी व 7 वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र, शाळा माहिती प्रपत्र आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करून परीक्षा तयारीकडे लक्ष देणे फायदेशीर
ठरेल.
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2026 कधी होणार आहे?
ऑनलाईन अर्ज (Application) भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा कोणत्या आहेत?
अतिविलंब शुल्क आणि अति विशेष विलंब शुल्क वेळापत्रक काय आहे?
अति विशेष विलंब शुल्क: 25 ते 28 फेब्रुवारी 2026

