✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 २० फेब्रुवारी २०२६
![]() |
| नारायणपूर (करसपली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती उत्सवात ग्रामस्थ, शिवसैनिक व युवा सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग |
सिरोंचा प्रतिनिधी:- नारायणपूर (करसपली) ता. सिरोंचा येथे तिरेली कुणबी समाज व सकल हिंदू धर्मीयांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी ३९६ व्या शिवजयंती उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. गावात आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयघोषात उत्सव साजरा केला.
संबंधित बातमी वाचा:
गडचिरोली येथे शिवसेना (शिंदे गट) कडून शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अखंड हिंदुस्थानचे हृदयसम्राट मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवाचा सोहळा येथे सातत्याने पार पडत आहे. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व शिवचरित्राचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रतिष्ठित शिवभक्त संघटना प्रमुख श्री. भिमकरी वेंकानाजी (नारायणपूर), मा. उपसरपंच केशवराजी नस्कुरी (नारायणपूर), आनंदराव शिवसैनिक (रापेली), उपसरपंच हारी अशोक, प्रशांत भाऊ नस्कुरी (शिवभक्त संघटना प्रमुख तथा शिवसेना तालुका संघटक प्रमुख, सिरोंचा) तसेच युवा नेते नारायणपूर उपस्थित होते.
Shivjayanti Utsav Celebrated with Enthusiasm in Narayanpur (Karasapalli)
तसेच नस्कुरी ओदेल भाऊ, नस्कुरी राजेंद्र भाऊ, रामेशसारजी काडेकारी, अशोक इंगिली, राजशेखर भिमकारी (शिवसेना युवा नेते), प्रशांत भाऊ चेमाकारी (टाकींग रापेली), वेंकटसावमी रापेली, रामेश नागेश इंगिली, चेमाकरी गट्टू, संपत दाया, चेंदरशेकार चेमाकरी (भाजप नेते), नागराजभाऊ इंगिली (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), दूंडु रुदयास्वामी, संपत इंगिली, वेंकटेश कडेकारी, बापुराव नस्कुरी, राजू नस्कुरी, भास्कर नस्कुरी, वेंकटेश नुसेट्टी, शेखर येमपली, चेंदू इंगिली, गणेश कडेखारी, सुधाकर तोंबारा, राजन्ना चेमाकरी, चौधरी जंमपी, गणेश दाय, शेखर इंगिली, श्रीमती रेणुका रामेश कडेखरी, मोनिका प्रशांत चेमाकरी, श्री लक्ष्मी चेंदराशेकार चेमाकरी आदी शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत माता, जय आई भवानी, जय जगदंब” अशा जयघोषात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे व युवकांच्या सहभागामुळे उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


भिमराव मदवी
उत्तर द्याहटवा