भंडाऱ्यात ईव्हीएम घोळ प्रकरणी मोठी कारवाई; मतमोजणी केंद्रावरील 7 अधिकारी निलंबित

Rambhau
0

 ✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )

 🌐 22 डिसेंबर 2025

भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान ईव्हीएम घोळ प्रकरणात सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

राज्यात रविवारी पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर भंडारा जिल्ह्यात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सात कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रविवारी मतमोजणी सुरू असताना भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील एका ईव्हीएम मशीनबाबत वाद निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचे नाव संबंधित ईव्हीएममध्ये दिसत नसल्याचा आरोप पक्षाच्या उमेदवाराने केला. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनंतर प्रशासनाने तपास केला असता मतमोजणी प्रक्रियेत गंभीर चूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी ही चूक अक्षम्य असल्याचे मान्य करत तात्काळ कठोर पाऊल उचलले. मतमोजणी केंद्रावर जबाबदारी सांभाळणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले.

निलंबनाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उपविभागीय अधिकारी, तलाठी, लिपिक, केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांचा समावेश आहे. या घटनेनंतर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणामुळे भंडाऱ्यातील राजकीय वातावरण तापले असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे —

मोहम्मद इसरार – उपविभागीय अधिकारी, उपसा सिंचन उपविभाग क्र. 1, आंबाडी

ए. एन. मळघने – तलाठी, चांदोरी

पियुष शक्करवार – लिपिक-टंकलेखक, नगर परिषद भंडारा

के. एच. लांजेवार – शिक्षक, जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भंडारा (केंद्राध्यक्ष)

जी. एस. नागदेवे – शिक्षक, विकास माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, खरबी नाका (मतदान अधिकारी क्र. 1)

महेश हेमराज दुर्गाडे – सी.ई.ए., प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, एम.आर.आर.डी.ए., भंडारा (मतदान अधिकारी क्र. 2)

लीनादेवी चीचमलकर – शिक्षिका, नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा (मतदान अधिकारी क्र. 3)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!