✍️ रामकृष्ण बोरुले (लोकवाणी आवाज )
🌐 २२ डिसेंबर २०२१
सावंगी (जि. गडचिरोली) दि. 20 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सावंगी यांच्या वतीने वैनगंगा नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा, कमलेश उके विद्यालय, बचत गटातील महिला तसेच गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पाणी साठवण क्षमता वाढवून शेती व ग्रामविकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या वेळी मा. प्रभाताई ढोटे (सरपंच), मा. सुमन मेश्राम (उपसरपंच), मा. देवानंद बन्सोड (सदस्य), रानुभाऊ कुरेशी (सदस्य), मा. गुरनुलेजी, मा. शालू मेश्राम सदस्या, या. मिरा पेलने (सदस्य), नैना सहारे (सदस्य), तसेच कावळे साहेब (ग्रामपंचायत अधिकारी, सावंगी) उपस्थित होते.
याशिवाय लाडे सर (मुख्याध्यापक), जिल्हा परिषद शाळा व सर्व शिक्षक वृंद व कमलेश उके विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, बचत गटातील महिला आणि गावातील नागरिकांनी या कामात मोलाचे सहकार्य केले. या सामूहिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोप्याची भावना अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


